विद्यापीठातील सुरक्षा ऐरणीवर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 जानेवारी 2019

पुणे - देशातच नव्हे, तर जागतिक पातळीवर नामांकित विद्यापीठाच्या यादीत स्थान मिळविलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गेल्या वर्षभरात कर्मचाऱ्यांवर हल्ला, दारूच्या नशेत विद्यार्थिनींची छेडछाड, यांसह जानेवारीत विद्यापीठ परिसरातील गवताला लागलेली आग, पदवी प्रदान सोहळ्यात विद्यार्थ्यांनी घातलेला गोंधळ, अशा घटना घडल्या असून, यामुळे विद्यापीठातील सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्‍न उपस्थित होत आहे. त्यामुळे एकीकडे जागतिक स्तरावरील रॅंकिंगमध्ये विद्यापीठ स्थान उंचावत असताना, दुसरीकडे मात्र विद्यापीठातील सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा नुकताच झाला, या सोहळ्यात काही विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत व्यासपीठाकडे घेतली आणि परिणामी विद्यापीठातील वातावरण काही काळ तापले होते. या घटनेचे निमित्त झाले आणि विद्यापीठाच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावर आवारात चर्चा रंगू लागली. गैरप्रकारांना आळा बसावा, म्हणून विद्यापीठाने ठोस पावले उचलली पाहिजेत, असे काही विद्यार्थ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. चांगले शिक्षण मिळावे, म्हणून विद्यापीठात आले.

घरापासून कोसो दूर असणाऱ्या वसतिगृहात राहते. परंतु विद्यापीठात घडणाऱ्या घडामोडींमुळे आई-वडीलही काळजी करतात, असे स्वप्नाली शिंदे (नाव बदलले आहे) हिने सांगितले.

नादुरुस्त सीसीटीव्हींची संख्या ६० हून अधिक
विद्यापीठातील प्रशासकीय इमारत आणि रस्ते यावर जवळपास २०८ सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. त्यातील ९० सीसीटीव्ही रस्त्यावर आहेत. त्याचप्रमाणे ३०९ विविध विभागांनुसार बसविले आहेत. विद्यापीठातील नादुरुस्त सीसीटीव्हींचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात ६० ते ६५ सीसीटीव्ही नादुरुस्त आढळले आहेत. त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्याचे विद्यापीठातर्फे सांगण्यात आले.

Web Title: University Security Issue