बारामतीकरांनो, लॉकडाऊन मागे घेतलाय तरी, काळजी घ्या!

unlock declared in Baramati after 14 days lockdown 
unlock declared in Baramati after 14 days lockdown 

बारामती : गेले 14 दिवस सुरु असलेला लॉकडाऊन सोमवारपासून (ता. 21) मागे घेण्यात आला असून ठराविक अपवाद वगळता इतर सर्व व्यवहार सकाळी नऊ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. 

उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या दालनात आज झालेल्या बैठकीत कांबळे यांनी हा निर्णय जाहीर केला. नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, सभापती नीता बारवकर, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, तहसिलदार विजय पाटील, मुख्याधिकारी किरणराज यादव, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे,  राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर आदी या प्रसंगी उपस्थित होते. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हॉटेल, जिम, पानपट्टी, शाळा महाविद्यालय या सह  केंद्र व राज्य शासनाने ज्यावर प्रतिबंध घातला आहे, अशा बाबी वगळता इतर सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. 

दुकानदार व त्यांचे कर्मचारी तसेच दुकानात येणा-या प्रत्येकाला मास्कचा वापर अनिवार्य असेल, दुकानात येणा-या प्रत्येक ग्राहकाचे हात सॅनेटाय़झरने स्वच्छ केले जातील, प्रत्येक ग्राहकाचे थर्मल स्क्रिनींग व ऑक्सिजन लेव्हलचीही तपासणी अनिवार्य करण्यात आली असून येणा-या प्रत्येक ग्राहकाचा नाव पत्ता व मोबाईल क्रमांक नोंदविणे अनिवार्य करण्यात आले आहे. 

'जम्बो'ने कामगिरी सुधारली; एकाच दिवशी २८ रुग्णांना दिला डिस्चार्ज!

दरम्यान किराणा मालाच्या दुकानात पानपट्टीवरील काही वस्तूंची सर्रास विक्री सुरु असल्याची तक्रार या बैठकीत झाली. अशी विक्री करताना कोणीही दुकानदार आढळल्यास त्यावर कडक कारवाईचा इशारा कांबळे यांनी दिला. दरम्यान बाजारपेठेमध्ये संशयित रुग्णांची तपासणी करण्याबाबतही सूचना करण्यात आली. 

बारामती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र गुजराथी, मर्चंटस असोसिएशनचे अध्यक्ष महावीर वडूजकर, माजी नगराध्यक्ष जवाहर वाघोलीकर, सुशील सोमाणी, प्रवीण आहुजा, स्वप्नील मुथा, विजय आगम यांनी या वेळी सूचना मांडल्या. रमणिक मोता, फखरुशेठ भोरी, नरेंद्र मोता, भारत खटावकर, शामराव तिवाटणे, शैलेश साळुंके, किरण गांधी, सागर चिंचकर, महेश साळुंके, दीपक मचाले, गणेश फाळके  आदी या बैठकीस उपस्थित होते. 

भोर शहर उद्यापासून पुढील आठ दिवसासाठी पुन्हा प्रतिबंधित क्षेत्र जाहीर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com