उन्नाव, कठूआ अत्याचाराच्या निषेधार्थ भारिपची पुण्यात उद्या निदर्शने

श्रीधर ढगे
शनिवार, 14 एप्रिल 2018

खामगाव : उन्नाव व कठूआ येथील अत्याचाराच्या निषेधार्थ उद्या १५ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता पुणे येथील गुडलक चौकात भारिप बहुजन महासंघाच्या वतीने निदर्शने करण्यात येणार आहेत. याबद्दलची माहिती प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनी 'सकाळ' ला दिली आहे.

असिफा (जम्मू) व उन्नाव मधील पीडितांना न्याय मिळाला पाहिजे. तसेच आरोपींना पाठीशी घालणाऱ्या बलात्कारी मनोवृत्तीचा आणि सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी हे आंदोन करण्यात येत आहे. ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेनृत्वाखाली हे आंदोलन होत असल्याची माहिती सोनोने यांनी दिली. तसेच भाजप सरकार बेटी बचाओ, बेटी पढाओ घोषणा देत असते मात्र आता भाजपसे बेटी बचाओ असे म्हणायची वेळ आली असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना म्हटले. 

योगी आदित्यनाथ सरकारने माजी मंत्री चिन्मयनंद विरोधातील रेप केस मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. पीडिता याविरोधात दाद मागत आहे. अशीच दाद उन्नावच्या पीडित मुलीने आदीत्यनाथ सरकारकडे केली होती. त्याबदल्यात तिच्या पित्याचा मृतदेह तिला मिळाला. बलात्कारी आमदार सुरेश सिंग सेनगल मोकाट सूटला. जम्मू मधील असिफा नामक चिमुकलीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार केला गेला. 

हिंस्त्र, पाशवी संस्कृती विरोधात समतामूलक शांती आणि न्यायप्रिय विकसित समाजासाठी एकत्र येण्याची आता गरज असून, पुणे येथील आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन देखील सोनोने यांनी केले आहे.

Web Title: Unnao and Kathua rape cases pune protest