उन्नती फाऊंडेशनच्या वतीने डॉक्टरांचा सन्मान

मिलिंद संधान 
मंगळवार, 3 जुलै 2018

नवी सांगवी (पुणे) : पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाऊंडेशनच्या वतीने डॉक्टर्स डेचे औचित्य साधून रुग्णसेवा करणाऱ्या सर्व डॉक्टरांचे भेटकार्ड देऊन आभार मानण्यात आले.

पैशाअभावी कुणाचाही जीव जाऊ नये यासाठी केंद्र आणि राज्य सरकार आरोग्याच्या विविध योजना राबविते. या योजनांचा लाभ लाभ गरजू रुग्णांना मिळवून देऊन डॉक्टरांनी त्यांचा दुवा घेतल्यास खऱ्या अर्थाने डॉक्टर डे साजरा केल्यासारखा होईल, असे उन्नती सोशल फाऊंडेशनचे संथापक संजय भिसे या वेळी बोलताना म्हणाले.

डॉक्टर आणि रुग्णांचे नाते सौहार्दाचे असावे. डॉक्टरांनी आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक राहून रुग्णांची मनोभावे सेवा करावी,असे आवाहन उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदा संजय भिसे यांनी केले. अजिंक्य विजय भिसे या कार्यक्रमास आदी उपस्थित होते.

Web Title: unnati foundation felicitate doctors on doctors day