हमाल, मापाडीचा भुसार बाजारात कडकडीत बंद 

3marketyard.jpg
3marketyard.jpg

पुणे : तोलाईच्या प्रश्नावर हमाल, मापाडी आणि भुसार व्यापार्‍यांत तोडगा न निघाल्याने शनिवार पासून मापाडी आणि हमालांनी मार्केटयार्डातील भुसार बाजारात बेमुंदत बंद पुकारला आहे. त्यामुळे या विभागात सकाळपासून गाड्या उतरूण घेणे तसेच भरणे हे काम ठप्प होते. उर्वरित कामे मात्र गाळ्यावर सुरू होते. 

गेल्या काही दिवसापासून भुसार विभागातील व्यापार्‍यांनी तोलाई देणे बंद केले आहे. त्याविरोधात गेल्या 25 ते 26 दिवसांपासून हमाल व मापाडी दि पुना मर्चटस चेंबरच्या प्रवेशद्वारावर उपोषणाला बसले होते. या प्रश्नाबाबत हमाल, मापाडी, व्यापारी आणि बाजार समिती यांच्यात बैठका पार पडल्या मात्र त्यात तोडगा न निघाल्याने मापाडी, हमालांनी शनिवारपासून बेमुंदत बंद पुकारला आहे. 

तोलाईच्या प्रश्नाबाबत काल सकाळी महात्मा फुले समता प्रतिष्ठान येथे कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या अध्यक्षतेखाली कृती समितीची बैठक पार पडली. या बैठकीत उद्या (सोमवारी) सकाळी 10.30 वाजता शिदोरीगृहापासून पणन मंडळाच्या कार्यालयापर्ययत मोर्चा काढून पणन संचालकाला तोलाई संदर्भात निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी कामगार युनियनचे विलास थोपटे, संतोष नांगरे, संजय साष्टे, हमाल पंचायतीचे नवनाथ बिनवडे, गोरख मेंगडे, तोलणार संघटनेचे राजेंद्र चोरघे, हनुमंत बहिरट आदी उपस्थित होते.                   

मापाड्यांना काम न देण्याची भूमिका 

गेल्या काही दिवसांपासून मार्केटयार्डातील भुसार बाजारात हमाल, मापाडींना काम न देण्याची भूमिका व्यापार्‍यांनी घेतली आहे. इलेक्ट्रॉनिक काट्यामुळे तोलणारांची गरज नसल्याचे व्यापार्‍यांचे म्हणणे आहे. मात्र हे प्रकारण न्यायप्रविष्ट असतानाही मापाडींना रोजगारापासून वंचित ठेवण्याचे काम सुरू आहे. बाजारात काही ठिकाणी मापाडींना कामावरून काढून टाकण्याचे प्रकार घडत आहेत. या अन्यायाविरोधात मापाडी, हमालांनी बेमुंदत बंद पुकारला आहे.
 - डॉ. बाबा आढाव, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य हमाल, मापाडी महामंडळ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com