अवकाळी पावसाच्या हलक्या सरीमुळे शेतकरी धास्तावला

राजकुमार थोरात
सोमवार, 19 मार्च 2018

अरबी समुद्रामध्ये तीव्र कमी दाबाचे क्षेत्र आणि मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थितीमुळे गुरुवार (ता. 15) पासून इंदापूर तालुक्यासह जिल्हामध्ये ढगाळ वातावरण झाले आहे.

वालचंदनगर - इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागामध्ये रविवारी (ता. 18)
रात्रीच्या वेळी अवकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्यामुळे शेतकरी
धास्तावले आहेत. अरबी समुद्रामध्ये तीव्र कमी दाबाचे क्षेत्र आणि मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थितीमुळे गुरुवार (ता. 15) पासून इंदापूर तालुक्यासह जिल्हामध्ये ढगाळ वातावरण झाले आहे.

सध्या शेतकऱ्यांच्या सुगीचा हंगाम जोरदार सुरु आहे. गहू व ज्वारी काढण्याच्या कामाला वेग आला आहे. अनेक शेतकऱ्यांचा गहू काढणीस आला आहे. शेतकऱ्यांना मजूर मिळत नसल्यामुळे गव्हाची व ज्वारीची काढणी रखडली आहे. अनेक शेतकऱ्यांनी ज्वारीची काढून करुन शेतामध्येच मळणी करण्यासाठी कणसे ठेवली आहेत. तसेच द्राक्षांचा बागांचा हंगाम ही शेवटच्या
टप्यामध्ये आहे. ढगाळ वातावरणामुळे गेल्या चार दिवसापासून शेतकरी वर्ग
धास्तावला होता. रविवार सायंकाळी इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील
लासुर्णे, अंथुर्णे, जंक्शन, बेलवाडी परीसरामध्ये हलक्या अवकाळी पावसाच्या
सरी कोसळल्यामुळे शेतकरी वर्ग चितांग्रस्त झाला असून पिकांच्या काढणीच्या
कामाला वेग आला आहे.

Web Title: unseasonal rain farmer agriculture disadvantage