खराडीत १०० ऑक्सिजन बेड पडून

खासगी तसेच शासकीय रुग्णालयात हे बेड सहज उपलब्ध होत नसल्याने नातेवाइकांची धावपळ
kharadi oxygen bed
kharadi oxygen bedTeam esakal

पुणे, : शहरात ऑक्सिजन बेडच्या शोधात नागरिक रुग्णालयांमध्ये चकरा मारत असतानाच पुणे महापालिकेचे १०० ऑक्सिजन व ४०० आयसोलेशन बेडचे साहित्य खराडीतील कै. विठोबा मारुती पठारे क्रिडा संकुलात धुळखात पडले आहे. शहरातील स्थिती बिघडलेली असताना महापालिकेने या लाखो रुपयांच्या साहित्याचा योग्य वापर करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशा मागणी आम आदमी पक्षाने (आप) महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.

पुणे शहरात रोज हजारो कोरोना रुग्णांची भर पडत आहे. गंभीर रुग्णांची संख्या वाढत असल्याने व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेडची मागणी वाढलेली आहे. खासगी तसेच शासकीय रुग्णालयात हे बेड सहज उपलब्ध होत नसल्याने नातेवाइकांची धावपळ सुरू आहे.

kharadi oxygen bed
पुणे जिल्ह्यात दिवसभरात ११६ कोरोना रुग्णांचा मृत्यू

महापालिकेने खराडीतील क्रीडा संकुलात ऑक्सिजन बेड ठेवले आहेत. पण, शहरात आणीबाणीची स्थिती निर्माण होऊनही बेडचा वापर सुरू केलेला नाही.‘आप’चे डॉ. अभिजित मोरे, गणेश ढमाले, उमेश बागडे, रोहन रोकडे यांनी खराडीतील क्रीडांगणास भेट देवून तेथील स्थितीची पाहणी केली.

डॉ. मोरे म्हणाले, ‘‘क्रीडांगणात १०० ऑक्सिजन आणि सुमारे ४००- ५०० आयसोलेशन बेडसाठी लागणारी सर्व यंत्रणा, बेड्स, ऑक्सिजन पाइप्स, इतर सामान दोन ते तीन महिन्यांपासून धूळखात पडले आहे. हे केंद्र सुरू करावे; अन्यथा या विरोधात आंदोलन करावे लागेल.’’

kharadi oxygen bed
पुणेकरांच्या ‘केअर’साठी आता गल्लीबोळात ‘सेंटर’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com