विमानासाठीच्या वायरिंग सुविधेचे 'जीकेएन' एरोस्पेस तर्फे अनावरण

Unveiled by GKN Aerospace for the aircraft's wiring facilities
Unveiled by GKN Aerospace for the aircraft's wiring facilities

पुणे : चाकण येथे 'जीकेएन एरोस्पेस कंपनी'च्या विमानासाठी 'वायरिंग' सुविधा पुरविणाऱ्या सुविधेचे अनावरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे 'कंपनी'मध्ये कर्मचारी म्हणून ७० टक्के महिलांना संधी देण्यात येणार आहे, असे 'जीकेएन फोकर एल्मो'चे उपाध्यक्ष मिशेल बोरेंडसे यांनी सांगितले.

सेनापती बापट रस्त्यावरील 'जेडब्ल्यू मेरिऍट हॉटेल'मध्ये मंगळवारी सुविधेचा अनावरण सोहळा पार पडला. तेंव्हा ते बोलत होते. यावेळी 'अन्ड्रीआन लेयटे', 'मार्टिन डुर्विल्लर', विजय शहाणे आदी उपस्थित होते.

Video:पबजी खेळून डोकं फिरलं, घटनेपेक्षा तरुणाचं नाव जास्त चर्चेत! 

कंपनीच्यावतीने भारतात २०२० मध्ये २०० नोकऱ्या निर्माण केल्या जाणार आहे, असे 'लेयटे' यांनी सांगितले. ते म्हणाले, "भारतामध्ये हवाई क्षेत्रात वाढत चाललेली गुंतवणूक बघता आम्ही हा प्रकल्प येथे सुरु केला आहे. पुण्यामध्ये शैक्षणिक संस्था मोठ्या प्रमाणावर आहे. त्यातून कुशल मनुष्यबळ निर्माण होईल. तसेच माहिती तंत्रज्ञान, तसेच इतर आवश्यक सुविधा उपलब्ध असल्यामुळे आम्ही येथे गुंतवणूक केली आहे." 

स्थायीचे अध्यक्षपद रासनेंकडे, तर सभागृह नेतेपदाची माळ घाटेंच्या गळ्यात 

चीन नंतर भारतात हि सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. याद्वारे प्रवासी विमानासाठी आवश्यक उच्च दर्जाची वायरिंग सुविधा पुरवली जाणार आहे. विशेष म्हणजे महिलांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा कंपनीचा मानस आहे, असे शहाणे म्हटले.

 पबजीमुळे पुण्यात 16 वर्षाच्या मुलाची आत्महत्या

''कंपनीच्यावतीने एक कोटी डॉलरची गुंतवणूक करण्यात आली असून, त्याद्वारे कौशल्यपूर्ण मनुष्यबळ, आवश्यक उच्च दर्जाची यंत्रसामुग्री घेण्यात आली आहे. भविष्यात चालक आणि अभियंत्यांसाठी ८०० नोकऱ्या आम्ही निर्माण करू.''
-  मिशेल बोरेंडसे, उपाध्यक्ष, जीकेएन फॉकर एल्मो.

Video:पबजी खेळून डोकं फिरलं, घटनेपेक्षा तरुणाचं नाव जास्त चर्चेत! 

वायरिंग सुविधेची वैशिष्ट्ये
- देशातील विमान उत्पादनासाठी पूरक सुविधा
- पुढील पाच वर्षात ८०० नोकऱ्यांची निर्मिती
- १२ वी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या महिलांना संधी
- भविष्यात संरक्षण आणि विमान वाहतुकीसाठी महत्वपूर्ण सुविधा

पुणे : मार्केटयार्डात राजस्थानी गाजराचा हंगाम सुरू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com