
Uorfi Javed :...त्यामुळेच चित्रा वाघ यांनी उर्फीचं नाव समोर आणलं; अंधारेंनी सांगितलं कारण...
मुंबई - मागील काही दिवसांपासून भाजप नेत्या चित्रा वाघ, अभिनेत्री उर्फी जावेद आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यात वाद पेटला आहे. उर्फीने डिवचल्यानंतर चित्रा वाघ आक्रमक होतायत. त्यातच या वादावर सुषमा अंधारे यांनी चित्रा वाघ यांच्यावर जोरदार टीका केली. (Sushma Andhare news in Marathi)
देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत भाजपचे नाहीत. ते गृहमंत्री म्हणुन कुचकामी ठरतायत. माझ्या सभा रद्द केल्या जातात आणि तिथच भाजपच्या सभा होतात हा दुटप्पीपणा नाही का, असा प्रश्न अंधारे यांनी उपस्थित केला. तुम्ही महिला आयोगाचा देखील अपमान करतात. वास्तविक महिला आयोगाला दिवाणी न्यायालयाचा दर्जा आहे, आयोगाला केराची टोपली दाखवली. पण बिनकामी बाईला तुम्ही खडसावलं का नाही? असा प्रश्न विचारत अंधारे यांनी चित्रा वाघ यांच्यावर हल्ला चढवला.
कदाचित रुपाली चाकणकर यांना खाली खेचून चित्रा वाघ यांना महिला आयोगाच अध्यक्ष व्हावं अस वाटत असेल म्हणून उर्फी जावेदचं प्रकरण समोर आणलं गेलं असावं. एका महिलेला भाजपकडून आणि श्रीकांत देशमुख यांच्या कुटुंबीयांकडून त्रास दिला जात आहे. राहुल शेवाळे आणि संजय राठोड यांच्या बाबतीत देखील हेचं झालं. त्यामुळे कुणी काय कपडे घालायचे, हे तुम्हाला महत्वाचं आहे की एखाद्या पीडितेला न्याय देणे ते सांगा, असा जाब अंधारे यांनी चित्रा वाघ यांना विचारला.
प्रकाश महाजन माझ्यासाठी अजिबात महत्त्वाचे नाहीत. आमच्या पक्षावर बोलण्यापेक्षा आपला पक्ष तेरा वरून एक वर आलाय, तो पुन्हा एक वरून तेरावर नेता येईल का ते याचा महाजनांनी अभ्यास करावा. माझ्यावर आणि रश्मी वहिनींवर अशा टिप्पणी करून हे लोक त्यांची वैचारिक कुवत दाखवत आहेत. त्यांची वैचारिक पातळी यावरून लक्षात येते, असंही अंधारे म्हणाल्या.