नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदरचा कायापालट घडवेल - शिवतारे

श्रीकृष्ण नेवसे
सोमवार, 9 जुलै 2018

सासवड (पुणे) : पुरंदर तालुक्यात जेजुरीची विस्तारीत एमआयडीसी, गुंजवणी धरण प्रकल्प, जलसंधारण व जलयुक्त शिवार अभियानाची कामे होत आहेत. त्याशिवाय येथे होणारे नियोजीत छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे रोजगार, व्यावसायिक संधीसाठी व कृषीमाल निर्यातीसाठी लाभदायक ठरणार आहे. त्यातून ज्या सुविधा येतील त्यातून तालुक्याचा कायपालट होणार आहे. या साऱया विकासाचा फायदा भविष्यात होणार आहे., अशी ग्वाही जलसंधारण व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी येथे व्यक्त केले. 
   
सासवड (ता. पुरंदर) येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात विजय शिवतारे मित्र मंडळातर्फे विविध स्पर्धा परीक्षात यश मिळविलेल्यांचा व दहावीमध्ये तालुक्यातील सर्व शाळांत चमकदार कामगिरी करणाऱया 180 विद्यार्थ्यांचा रोख रक्कमेसह वृक्ष रोप देऊन श्री. शिवतारे यांच्या हस्ते गौरव झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सभापती अतुल म्हस्के, दत्ता काळे, दिलीप यादव, शालन पवार, ज्योती झेंडे, गोरखनाथ माने, रमेश जाधव, नलीनी लोळे, अर्चना जाधव, दादा घाटे, रावसाहेब पवार, प्रदिप लांडगे, अस्मिता रणपिसे आदी उपस्थित होते. 

शिवतारे म्हणाले., शिक्षणात चमकत असताना आणि इतिहास वाचत असताना नवा इतिहास घडविण्याचे धेय्य डोळ्यापुढे हवे. तसेच आपल्या सभोवती रोजगार, व्यावसायिक संधी, कृषी विकास, अौधोगिक विकास हवा. ते काम आपण हाती घेत त्याला गती दिली आहे. विद्यार्थ्यांनी फक्त प्रयत्न, जिद्द, चिकाटी आत्माविश्वासपूर्ण ठेवावी. यानिमित्ताने अशिष पवार, अपूर्वा पवार, पोर्णिमा पोमण, राजेसाहेब लोंढे, संतोष पवार, सुरेखा ढवळे, लक्ष्मण धर्माधिकारी आदींनीही मनोगत व्यक्त केले. तर दिलीप यादव, अतुल म्हस्के, रावसाहेब पवार यांनी यशस्वीतांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आत्माराम शिंदे यांनी केले.  

दहावीपूर्वीच सर्व दाखले देण्याचा निर्णय करु - राज्यमंत्री शिवतारे 
पालकांमधून सुरेखा ढवळे व लक्ष्मण धर्माधिकारी यांनी डोमासाईल, जातीचे दाखले व इतर दाखले दहावीची परिक्षा होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना शाळेतच यंत्रणेकडून मिळावेत., अशी मागणी केली. त्यावर राज्यमंत्री शिवतारे यांनी पुरंदर तालुक्यापुरताच नाही, तर संपूर्ण राज्यासाठी हे दाखले दहावी परिक्षेपूर्वी देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांना घेण्यासाठी आग्रह धरु., असे जाहीर केले. 

गरीबीमुळे शिक्षण कोणाचे थांबू नये
पुरंदर तालुक्यात गरीबीमुळे शिक्षण कोणाचे थांबू नये. त्यासाठी आपण मदत करु. नुकत्याच झालेल्या नोकरी मेळाव्यात 1,800 जणांना नोकरीची संधी मिळाली. सध्याही नोकरी छोटे मेळावे दर शनिवारी माझ्या सासवड कार्यालयात सुरु आहेत. त्याचा तरुण तरुणींनी लाभ घ्यावा., असे आवाहन विजय शिवतारेंनी केले.   

Web Title: upcoming airport changes purandar said vijay shivtare