पुणे विद्यापीठ चाैकातील पुलांबाबत काय आहेत अपडेट, वाचा सविस्तर

BRI.jpg
BRI.jpg

पुणे : पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पाडण्याचे काम जवळपास साठ ते सत्तर टक्के पूर्ण झाले आहे. 14 ऑगस्टपर्यंत पूर्ण होईल, असा दावा पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) करण्यात आला आहे. दरम्यान या पूल पाडण्यातून सुमारे 18 हजार मेट्रिक टन एवढा राडारोडा तयार होणार असून त्याचा रस्त्याचे बेस कोट आणि पेव्हर ब्लॉकसाठी देखील पुनर्वापर करण्याचे नियोजन टाटा-सिमेन्स कंपनीकडून करण्यात आले आहे. 

हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान मेट्रो प्रकल्पाचे काम पीएमआरडीएकडून हाती घेण्यात आले आहे. हा मेट्रो मार्ग विद्यापीठ चौकातून जाणार आहे.हा संपूर्ण मार्ग इलेव्हेटेड असल्यामुळे विद्यापीठ चौकातील पूल त्याला अडथळा ठरत होते. त्यामुळे हे पूल पाडण्यास महापालिका आणि राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यानुसार पूल पाडण्याचे काम टाटा-सिमेन्स या कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीकडून गेल्या महिन्यात 13 जुलैपासून पूल पाडण्यास सुरवात केली आहे. आतापर्यंत पूल पाडण्याचे काम जवळपास साठ ते सत्तर टक्के झाले आहे. येत्या 14 ऑगस्टपर्यंत शंभर टक्के काम पूर्ण करण्याचे नियोजन या कंपनीकडून करण्यात आली असल्याची माहिती पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

या पूल पाडण्यातून सुमारे 18 हजार मेट्रिक टन एवढा राडारोडा निर्माण होणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कॉंक्रिट आणि स्टील मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांची विल्हेवाट कशी लावायची, यांचा देखील आराखडा कंपनीकडून करण्यात आला आहे. त्यानुसार बावधन येथे भाड्याने जागा घेऊन एक प्लॅंट उभारण्यात आला आहे. त्या ठिकाणी हा सर्व राडारोडा नेला जातो. तेथे तो क्रश करून त्यापासून खडी तयार करणे, पेव्हर ब्लॅक तयार करणे आदी प्रक्रिया करण्यात येत आहे. तर स्टीलचे बारीक तुकडे करून त्यावर पुनप्रर्क्रिया करून पुन्हा स्टील बनविण्यात येणार आहे. या कामासाठी नागपूर येथील एका एजन्सीची मदत घेण्यात आली असल्याचे असे टाटा -सिमेन्स कंपनीचे कुलदीप राठी यांनी सांगितले. 

हा पूल एक पॉइंट दोन किलोमीटर लांबीचा आहे. तो पाडून पूर्ण झाल्यानंतर रस्ता दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी देखील या राडारोड्याचा वापर करण्याचे नियोजन आहे. रस्त्याचा बेस मजबूत करण्यासाठी राडारोड्यावर प्रक्रिया करून त्यातून निर्माण झालेली खडी वापरण्यात येणार आहे, असेही पीएमआरडीकडून सांगण्यात आले. 

- संपूर्ण पूल पाडण्याचे काम 14 ऑगस्टपर्यंत पूर्ण करणार 
-पूल पाडण्यातून सुमारे 18 हजार मेट्रिक टन राडारोडा निर्माण होणार 
-राडारोड्यावर प्रक्रिया करण्यासाठी बावधन येथे प्रकल्प 
-राडारोड्यापासून खडी, पेव्हर ब्लॉक, तर स्टीलचे तुकडे करून प्रक्रिया करणार 
-निर्माण झालेली खडी रस्ता दुरुस्ती व अन्य कामांसाठी वापरली जाणार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com