अश्‍लील फोटो "अपलोड' करून बदनामी करणाऱ्यास अटक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

पुणे - लग्न मोडल्याचा राग मनात धरून युवतीचे अश्‍लील फोटो फेसबुकवर "अपलोड' करून बदनामी करणाऱ्यास येरवडा पोलिसांनी अटक केली. आरोपीची न्यायालयाने 27 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली. 

पुणे - लग्न मोडल्याचा राग मनात धरून युवतीचे अश्‍लील फोटो फेसबुकवर "अपलोड' करून बदनामी करणाऱ्यास येरवडा पोलिसांनी अटक केली. आरोपीची न्यायालयाने 27 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली. 

गौतम अशोक चिटपेल्ली (वय 28, रा. वरळी मुंबई, मूळ रा. जयचंद्र, तेलंगण) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध वीसवर्षीय युवतीने फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी पसार झाला होता. फिर्यादी आणि आरोपी गौतम यांचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर आरोपी फिर्यादीला भेटल्यानंतर अंगलट करीत असे. यामुळे त्यांच्यात वाद झाला आणि लग्न मोडले. आरोपीने फिर्यादी युवती आणि तिच्या भावाच्या नावाने "फेसबुक'वर बनावट "अकाउंट' उघडले आणि युवतीचे अश्‍लील फोटो त्यावर "अपलोड' केले. तुझे लग्न कसे होते ते पाहून घेतो, अशी धमकीही त्याने दिली होती. आरोपीला अटक करून पोलिस कोठडी देण्याची मागणी पोलिसांनी न्यायालयाकडे केली होती.

Web Title: By uploading pornographic photo