UPSC Result : यूपीएससीत चमकली महाराष्ट्राची सृष्टी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 एप्रिल 2019

यंदाचे राष्ट्रीय पातळीवरील मानकरी
1. कनिष्क कटारिया, 2. अक्षत जैन, 3. जुनैद अहमद, 4. श्रवण कुमार, 5. सृष्टी जयंत देशमुख, 6. शुभम गुप्ता, 7. कर्नाटी वरूणरेड्डी , 8. वैशाली सिंह, 9. गुंजन द्विवेदी, 10. तन्मय वशिष्ठ शर्मा.

नवी दिल्ली : देशाला सनदी अधिकाऱ्यांची रसद पुरविणाऱ्या संघ लोकसेवा आयोगाच्या अर्थात यूपीएससीच्या 2018 मध्ये झालेल्या नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल आज सायंकाळी घोषित करण्यात आला. महाराष्ट्रातील सृष्टी जयंत देशमुख ही देशात पाचवी व मुलींमध्ये पहिली आली.

यंदाच्या 759 उत्तीर्ण उमेदवारांच्या यादीत सहा ते सात मराठी नावे दिसत आहेत. मात्र पहिल्या पन्नास गुणवंतांमध्ये पाच मराठी तरुणांनी यश मिळविले. यंदाच्या यूपीएससी परीक्षेत कनिष्क कटारिया याने देशात अव्वल येण्याचा मान मिळविला. अंतिम उत्तीर्णांसाठी फेब्रुवारी 2019 मध्ये दिल्लीच्या शहाजहॉं रस्त्यावरील धौलपूर हाउसमध्ये यूपीएससी मुख्यालयात तोंडी मुलाखतींचे आयोजन करण्यात आले होते.

या परीक्षेतील यशस्वी मराठी विद्यार्थी असे ः
सृष्टी जयंत देशमुख (पाचवी), तृप्ती अंकुश धोडमिसे (16 वी), वैभव सुनील गोंदणे (23वा ), मनीषा माणिकराव आव्हाळे (33 वी), हेमंत केशव पाटील (39वा), श्रेणीक दिलीप लोढा (133 वा), दिग्विजय संजय पाटील (134 वा).

देशाच्या नोकरशाहीतील सर्वोच्च पदांसाठी ही परीक्षा घेतली जाते व हे अदिकारी पुढे जाऊन वरिष्ठ सनदी अधिकारी बनतात. भारतीय प्रशासनिक सेवा (आईएएस), भारतीय पोलिस सेवा (आईपीएस), भारतीय विदेश सेवा (आईएफएस), भारतीय राजकोषीय सेवा (आईआरएस), भारतीय इंजिनिअरिंग सेवा (आईईएस) और भारतीय रेलवे सेवा (आईआरटीएस) यांच्यासाठी याच माध्यमातून अधिकारी निवडले जातात. राज्यातून प्रथम आलेला कनिष्क कटारिया हा आयआयटी मुंबईचा पदवीधर आहे.

यंदाचे राष्ट्रीय पातळीवरील मानकरी
1. कनिष्क कटारिया, 2. अक्षत जैन, 3. जुनैद अहमद, 4. श्रवण कुमार, 5. सृष्टी जयंत देशमुख, 6. शुभम गुप्ता, 7. कर्नाटी वरूणरेड्डी , 8. वैशाली सिंह, 9. गुंजन द्विवेदी, 10. तन्मय वशिष्ठ शर्मा.

Web Title: UPSCs Result of the Civil Services Examination Result announced