उरुळी देवाची गावाचा करणार सर्वांगीण विकास - महापौर मुक्ता टिळक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

फुरसुंगी - कचरा डेपोमुळे उरुळी देवाचीच्या ग्रामस्थांनी अनेक गैरसोयी सहन केल्या आहेत; मात्र आता हे गाव महापालिकेत आले असून पाणी, रस्ते, आरोग्य, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन, वीज याबाबतच्या सर्व सुविधा देऊन गावाचा सर्वांगीण विकास करणार असल्याची ग्वाही महापौर मुक्ता टिळक यांनी आज उरुळी देवाची ग्रामस्थांना दिली.

कचरा डेपोग्रस्त उरुळी देवाचीमध्ये पालिकेच्या वतीने एक कोटी तेरा लाख रुपयांच्या निधीतून होणाऱ्या विविध रस्ताकामांचे भूमिपूजन आज महापौर टिळक यांच्या हस्ते झाले, या वेळी झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. 

कचरा डेपो हटाव संघर्ष समितीचे अध्यक्ष भगवान भाडळे, उपाध्यक्ष विजय भाडळे, तात्यासाहेब भाडळे, सरपंच महानंदा सातव, उपसरपंच प्रशांत भाडळे, महापालिका सहआयुक्त सुरेश जगताप, नगरसेवक मारुती तुपे, दीपक मोरे, राजेश येनपुरे, लक्ष्मण नेवसे, संतोष भाडळे, दत्तात्रेय भाडळे, अनिरुद्ध पाचपुते, अनंता भाडळे, कैलाश शेवाळे, वैशाली पवार, गणेश शेवाळे, पंडित मोडक, आनंदा भाडळे, धनंजय कामठे आदी उपस्थित होते. 

या वेळी ग्रामस्थ म्हणाले, ‘‘कडक उन्हाळा असल्याने टॅंकरची संख्या अधिक करावी लागेल. पालिकेत घेतलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा आठ महिन्यांपासून तुम्ही पगार न दिल्याने ते आता गावात काहीच सेवा देत नाहीत. जुन्या पालखीमार्गाचे अर्धवट काम पूर्ण करा.’’

तात्यासाहेब भाडळे यांनी सूत्रसंचालन केले. विजय भाडळे यांनी आभार मानले.

उरुळी देवाची आता पुणे शहराचेच झाले आहे. लवकरच परिपूर्ण विकास आराखडा तयार करून गावाचा विकास करू. ७३ कोटींच्या पाणी योजनेचे पाणी गावाला जानेवारी २०२० मध्ये मिळेल. येथील कचरा डेपोतील ओपन डंपिंग बंद होण्यासाठी पुणे शहराच्या चारही दिशांना प्रक्रिया केंद्रे उभारत आहोत. पालिका अधिकारी जर तुमच्या विकासकामांत टाळाटाळ करत असतील, तर थेट मला कळवा; कडक कारवाई करू.
- मुक्‍ता टिळक, महापौर

Web Title: uruli devachi village development mukta tilak