उरुळी कांचन - विहिरीत गाडी पडल्याने दोघांचा मृत्यु

accident
accident

उरुळी कांचन - न्युट्रल अवस्थेमधील ब्रिजा गाडी अचानक मागे उतारावर सरकत विहीरीत कोसळुन झालेल्या अपघातात, एका महिलेसह दोन जऩ ठार झाले. हा अपघात उरुळी कांचन (ता. हवेली) जवळ शिंदवने गावच्या हद्दीतील काळेशिवार वस्तीवर गुरुवारी (ता. 9) सायंकाळी सहा वाजनेच्या सुमारास घडला. 

या अपघातात मारुती उर्फ दादा बबण खेडेकर (वय- 60, रा. खेडेकर मळा, उरुळी कांचन ता. हवेली) व सोनाली गणेश लिंबोणे (वय- 22, रा. काळेशिवार, शिंदवणे ता. हवेली) या दोघांचा मृत्यु झाला. 

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारुती खेडेकर व लिंबोणे कुटुंब एकमेकांचे नातेवाईक असुन, मारुती खेडेकर यांच्या ब्रिजा गाडीतुन दोन्ही कुंटुंब एका नातेवाईकाच्या कार्यक्रमासाठी बाहेर गावी गेले होते. मारुती खेडेकर दोन्ही पायांनी अपंग होते. सोनालीचे सासरे संभाजी राजाराम लिंबोणे हे गाडी चालवत होते. कार्यक्रम उरकुन मारुती खेडेकर लिंबोणे कुटुबांना सोडण्यासाठी काळेशिवार परीरातील लिंबोणे यांच्या घरी गेले होते. संभाजी लिंबोणे यांनी त्यांच्या घरासमोर गाडी उभी करुन, गाडीतील सर्वांना उतरण्यास सांगितले व स्वतः संभाजी लिंबोणे घरात पाणी पिण्यासाठी गेले होते. या दरम्यान गाडीतील सर्वजण उतरले मात्र मारुती खेडेकर व सोनाली आतच होते. त्याच दरम्यान सोनाली हिने आपल्याला गाडी चालवता येत असल्याचे सांगत, गाडीची एक चक्कर मारावयाची आहे असे संभाजी लिंबोणे यांना सांगितले. यावर लिंबोणे यांनी सोनालीला गाडी चालवु देण्यास नकार दिला. मात्र मुलगी गाडी चालवायची म्हणते तर का आडवे येतोस असे म्हणत मारुती खेडेकर यांनी सोनालीला गाडी चालवण्यास ससांगितले. गाडी न्युट्रलमध्ये सुरु करत असतांना गाडी मागे सरकत गेली. घरात व विहीराच्यामध्ये अवघे बारा फुटाचे अंतर असल्याने, गाडी सरकत सरकत थेट विहीरीत कोसळली. 

दरम्यान त्याचवेळी गाडीतुन उतरलेल्या नातेवाईकांनी गाडी विहीरीत कोसळल्याचे पहाताच, जोरजारात ओरडण्यास सुरुवात केली. ही बाब आजुबाजुच्या लोकांना समजताच, कांहीनी लोणी काळभोर पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती. सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत इंगवले व त्यांच्या सहकारी पोलिसांनीही तत्परत्ने हालचाली करत, क्रेनच्या साह्याने विहीरीतीत पडलेली ब्रिजा गाडी काढली. मात्र तत्पुर्वी गाडी विहीरीत पडताना गाडीच्या बाहेर विहीरीत फेकली गेलेली सोनालीला विहीरीत उतरलेल्या तरुणांनी शोधुन बाहेर काढले. वरील दोघांनाही उपचारासाठी उरुळी कांचन येथील खाजगी रुग्नालयात नेण्यात आले. माजत्र उपचारापुर्वीच दोघांचेही मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com