कोरनाचा हाहाकार वाढला! कंटेंन्मेट झोन राबविण्यास उरुळी कांचन ग्रामपंचायतची टाळाटाळ

Uruli Kanchan Gram Panchayat refuse to implement content zone
Uruli Kanchan Gram Panchayat refuse to implement content zone

लोणी काळभोर (पुणे) : उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत मागील दहा दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असतानाही, उरुळी कांचन हद्दीत कंटेन्मेट (प्रतिबंधीत क्षेत्र) झोनच्या तरतुदी लागु करण्यास टाळाटाळ होत आहे. त्याबाबतच्या सुचना लोणी काळभोरचे पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी केल्या होत्या, मात्र काहींना त्यास विरोध केल्याने ग्रामपंचायतीने पोलिसांच्या सुचनांना वाटाण्याच्या अक्षदा लावल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

लोणी काळभोर, उरुळी कांचन, मांजरी बुद्रुक, कदमवाकवस्तीसह पुर्व हवेलीत मागील कांही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने, हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी बुधवारी (ता. 8) रात्रीपासून हवेली तालुक्यातील वीस ग्रामपंचायत हद्दीत कंटेंन्मेट झोन जाहीर केला आहे. मात्र, उरुळी कांचन हद्दीत कंटेन्मेट (प्रतिबंधीत क्षेत्र) झोन जाहीर होऊन चार दिवसाचा कालावधी उलटुनही, उरुळी कांचन ग्रामपंचायत प्रशासन बॅरीकेटस लावण्याबरोबरच, गावात येजा करण्याऱ्या नागरीकांच्या नोदी ठेवण्यास टाळाटाळ करत आहे. पुर्व हवेलीत सर्वात जास्त कोरोनाबाधित रुग्ण उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत असताना प्रशासनाची टाळाटाळ नागरीकांच्या आरोग्याबाबत धोकादायक ठरु शकते

आमदार महेश लांडगे म्हणाले, 'लॉकडाउन करा, पण...'

याबाबत अधिक माहिती देतांना लोणी काळभोरचे पोलिस निरीक्षक सुरज बंडगर म्हणाले, ''उरुळी कांचन गावात याबाबतच्या सुचना सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना बैठक घेऊन दिलेल्या आहेत. मात्र, सुचना देऊनही ग्रामपंचायत प्रशासन टाळाटाळ करत आहे. याबाबतचा गोपनीय अहवाल शासनाला पाठवण्यात येणार आहे. कंटेंन्मेट झोन जाहीर झालेल्या लोणी काळभोर, कुंजीरवाडी व कदमवाकवस्ती ग्रामपंचायत प्रशासनानेही वरील कारवाई करणे अपेक्षित आहे. अन्यथा तीनही ग्रामपंचायतीचा गोपनीय अहवाल पाठविण्यास मागे-पुढे पाहणार नाही.'' 

तळेगावातील स्पोर्ट्स फिश प्रजनन प्रकल्प बंद असण्यामागे हे कारण... 

दरम्यान, उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्यावतीने बोलतांना उपसरपंच भाऊसाहेब कांचन म्हणाले, ''कंटेंन्मेट झोन जाहीर होऊन तीन दिवसांचा कालावधी उलटुनही उरुळी कांचन ग्रामपंचायत  दिलेल्या सुचनांचे पालण झालेले नाही ही बाब खरी आहे. लोणी काळभोर पोलिसांनीही याबाबत सुचना दिलेल्या होत्या. मात्र, आज दिवसभरात कोणत्याही परीस्थितीत कंटेन्मेट (प्रतिबंधीत क्षेत्र) झोनच्या तरतुदी लागु करण्यात येतील. 

Edited by : Sharayu Kakade

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com