अमेरिकेने अफगाणिस्तानला स्वत:चे सैन्य स्थापनेसाठी मदत करणे अपेक्षित होते-डॉ. शेषाद्री चारी

पुणे विद्यापीठात अफगाणी विद्यार्थ्यांशी साधला संवाद
afghan
afghansakal

पुणे : ‘‘अमेरिकेने आतापर्यंत अनेक वेळा अफगाणिस्तानात सैन्य पाठविले आणि मागे घेतले आहे. मात्र त्यांनी अफगाणी नागरिकांना स्वत:चे सरकार आणि  सैन्य स्थापन करण्यासाठी मदत करणे अपेक्षित होते, मात्र तसे झाले नाही. यात अर्थातच अमेरिकेचे काही राजकीय आणि भौगोलिक हितसंबंध आहेत. आता आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडी थांबवता येत नसल्या तरी, त्यावर मात कशी करावी, यासाठी अभ्यास करून ध्येय धोरणे ठरवणे शक्य आहे,’’ असे मत आंतरराष्ट्रीय धोरणाचे अभ्यासक डॉ. शेषाद्री चारी यांनी व्यक्त केले. (Pune News)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे अफगाणी विद्यार्थ्यांशी संवाद आणि ‘जिओ पॉलिटिकल स्ट्रॅटेजिक इम्पॅक्ट ऑफ अफगाणिस्तान क्रायसिस’ विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले होते. त्यावेळी डॉ. चारी बोलत होते. या कार्यक्रमात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्राध्यापक अरविंद कुमार, पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, आंतरराष्ट्रीय केंद्राचे संचालक डॉ. विजय खरे, एअर मार्शल भूषण गोखले, ॲल्युमिनाय असोसिएशनचे संचालक संजय ढोले आदी मान्यवर उपस्थित होते.

afghan
वाघोली: वाघेश्वर मंदिर परिसराचं सुशोभिकरण; सेल्फी पॉईंट बुधवारपासून सुरू

डॉ. चारी म्हणाले,‘‘प्रत्येक देश हा आपापले हित जपत असतो आणि त्यानुसार देशाचे धोरण ठरवतो. अफगाणिस्तानातील नागरिकांनी आपल्या देशाचे हित लक्षात घेत त्यानुसार लोकशाही मार्गाने आपला देश उभा करणे गरजेचे आहे.’’ तर प्रा. अरविंद कुमार म्हणाले,‘‘गेल्या अनेक वर्षांपासून भारत आणि अफगाणिस्तानाचे चांगले संबंध आहेत. तालिबानींना भारताशी संबंध टिकवायचे असतील, तर त्यांना लोकशाही मार्गानेच काम करावे लागेल. तालिबान्यांना आवर घातला, तरच भविष्यात अफगाणिस्तानात लोकशाही प्रस्थापित होऊ शकेल.’’

afghan
गणपतीच्या तयारी साठी लोकांची गर्दी; पाहा व्हिडिओ

‘‘सध्या पुण्यात जवळपास दोन हजार अफगाणी विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांच्या व्हिसा संपणे, राहण्याची सोय नसणे तसेच काही आर्थिक अडचणी आहेत. त्या सगळ्या अडचणी सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून सर्वोतोपरी मदत करण्यात येणार आहे.’’

- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com