मेट्रो कॉरिडॉरमध्येही वापरा बीडीपीचा टीडीआर 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

पुणे - जैववैविध्य उद्यान आरक्षणाच्या (बीडीपी) मोबदल्यात मिळणारा हस्तांतरणीय विकास हक्क (टीडीआर) मेट्रो मार्गाच्या 500 मीटर कॉरिडॉरमध्येही वापरता येणार आहे. 

समाविष्ट 23 गावांतील बीडीपी क्षेत्रासाठी राज्य सरकारने 8 टक्के टीडीआर देण्याची घोषणा केली आहे. ज्यांच्याकडे हा टीडीआर आहे, त्यांना त्यांचा वापर शहरात कोठेही करता येईल. मेट्रोचा कॉरिडॉरही त्याला अपवाद नसेल. 

याबाबत महापालिकेचे नगर अभियंता प्रशांत वाघमारे म्हणाले, ""विकास आराखड्यात सुमारे 950 आरक्षणे आहेत. त्यांचे संपादन करताना महापालिका रोख रक्कम देऊ शकत नाही. त्यामुळे जागामालकांना टीडीआर देण्यात येणार आहे. बीडीपीचे संपादन करण्यासाठी देण्यात येणारा टीडीआर शहरात कोठेही बांधकामासाठी वापरता येणार आहे. त्याला मेट्रो कॉरिडॉरचाही अपवाद नसेल.'' 

Web Title: Use BDT's TDR in Metro Corridor