अधिक वापर त्यांचे कमी बिल, तर कमी वापर त्यांचे अधिक बिल; महावितरणचा नवीन फंडा

उमेश शेळके 
बुधवार, 1 जुलै 2020

  • कमी वीज वापरली, मग जदा बिल भरा 
  • महावितरणचे अजब सूत्र 

पुणे : "वीज जपून वापरा, विजेची बचत करा' असे एकीकडे वारंवार महावितरणकडून सांगितले जाते. दुसरीकडे मात्र "जादा वीज वापरा, कमी बिल अन्‌ कमी वीज वापर, जादा बिल,' असा अजब सूत्र महावितरणने नव्याने स्वीकारले आहे. वीजदरवाढीच्या प्रस्तावाला महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने नुकत्याच दिलेल्या मान्यतेवरून हा प्रकार समोर आला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

महसुलात येणारी तूट भरून काढण्यासाठी महावितरणकडून वीज दरवाढीचा प्रस्ताव आयोगासमोर मांडण्यात आला होता. त्यास आयोगाने मान्यता दिली. त्यानुसार एक एप्रिलपासून राज्यात विजेच्या दरात वाढ लागू झाली आहे. नव्या दरानुसार 0 ते 100 युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या ग्राहकांना त्याचा सर्वाधिक फटका बसणार आहे. याउलट शंभर युनिटपेक्षा अधिक वीज वापर करीत असलेल्या ग्राहकांच्या वीज बिलात बचत होणार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे "अधिक वापर त्यांचे पूर्वीपेक्षा कमी बिल, तर कमी वापर त्याचे पूर्वीपेक्षा अधिक बिल ' असा नवीन फंडा महावितरणने सुरू केला असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. त्याचे ही उदाहरण. 
-------------- 
मोदींचे बिहार राजकारण : चीनच्या मुद्द्यावर शब्दही नाही छटपूजेचा मात्र आवर्जून उल्लेख
--------------
मोदींच्या भाषणावर राहुल गांधीना आठवला जुना शेर; काय आहे तो शेर?
--------------
कमी वीज वापर असणाऱ्यांचे असे वाढणार बिल 
समजा तुमच्या वीज वापर हा शंभर युनिटपर्यंत आहे. तर त्यांना पूर्वी म्हणजे मार्चपर्यंत प्रतियुनिट 3.05 पैसे या दराने शंभर युनिटचे 305 रुपये, याशिवाय 90 रुपये स्थिर आकार, 61 पैसे प्रतियुनिटनुसार 61 रुपये इंधन समायोजन आकार, 1 रुपये 28 पैसे प्रतियुनिट नुसार 128 रुपये वहन आकार आणि वरील सर्व आकारांवर 16 टक्के वीज शुल्क म्हणजे 93 रुपये 44 पैसे असे एकूण 677 रुपये 44 पैसे बिल येत होते. अशा प्रकारे पाच प्रकाराचे शुल्क आकारून बिल दिले जात होते. 

परंतु एक एप्रिलपासून वीजदरवाढ लागू करण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रतियुनिट 3. 46 पैसे या नवीन दराने शंभर युनिटचे 346 रुपये, याशिवाय 100 रूपये स्थिर आकार, 1 रुपये 45 पैसे या दरानुसार प्रतियुनिटनुसार वहन आकार 145 रुपये आणि वरील सर्व आकारावर 16 टक्के म्हणजे वीज शुल्क म्हणजे 94 रुपये 56 पैसे, असे 685 रुपये 56 बिल भरावे लागणार आहे. त्यामुळे 8 रुपये 12 पैसे प्रतिमहिना जादा भरावे लागणार आहे. मात्र यातून इंधन समायोजन आकार नवीन यामध्ये रद्द करण्यात आला आहे. तरी देखील चार प्रकाराचे शुल्क आकरून देखील दरमहा जादा वीजबिल येणार आहे. 

जादा वापर, कमी बिल 
जर तुमचा वीज वापर 200 युनिट आहे. तर त्यांना पूर्वी म्हणजे मार्चपर्यंत 3.05 प्रतियुनिट या दराने 100 युनिट पर्यंत 305 आणि त्यापुढील शंभर युनिटसाठी 6 रुपये 95 पैसे प्रतियुनिट प्रमाणे 695 असे मिळून 1 हजार रुपये वीज आकार, 90 रुपये स्थिर आकार, 100 युनिटपर्यंत 61 पैसे प्रतियुनिटनुसार 61 रुपये आणि त्यापुढील शंभर युनिटसाठी प्रतियुनिट 1 रुपये 8 पैसे नुसार 108 रुपये असे मिळून 169 रुपये इंधन समायोजन आकार आणि वरील सर्व आकारावर 16 टक्के वीज शुल्क म्हणजे 242 रुपये 40 पैसे असे एकूण मिळून 1 हजार 757 रुपये 40 पैसे बिल येत होते. 

आता नव्या दरानुसार म्हणजे एप्रिलपासून पहिल्या 100 युनिटसाठी 3 रुपये 46 पैसे प्रतियुनिट या दरानुसार 346 रुपये, त्यानंतरच्या 100 युनिटसाठी 7 रुपये 43 पैसे प्रतियुनिटप्रमाणे 743 असे मिळून 1089 रुपये वीज आकार, 1 रुपये 45 पैसे प्रतियुनिटनुसार 290 रुपये वीज वहन आकार आणि वरील सर्व आकरांवर 16 टक्के वीज शुल्क म्हणजे 236 रुपये 64 पैसे असे एकूण मिळून 1 हजार 715 रुपये 64 पैसे बिल भरावे लागणार आहे. त्यामुळे दोनशे युनिट पर्यंत वीज वापर असणाऱ्या ग्राहकांच्या वीज बिलात दरमहा 41 रुपये 76 पैशांची बचत होणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Use less electricity, then pay the extra bill Strange formula of MSEDCL