उसासाठी आधुनिक तंत्र व यंत्रांचा वापर करावा

Use modern techniques and tools for sugarcane
Use modern techniques and tools for sugarcane

दौंड : उसाची उत्पादकता वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करावा आणि ज्या तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे त्याचा नियमित आढावा घ्यावा. उसाच्या लागणीपासून तोडणीपर्यंत आधुनिक तंत्राचा वापर, माती परीक्षण, ठिबक सिंचन पद्धतीचा वापर, सेंद्रिय व रासायनिक खतांचा संतुलित वापर, सुधारित शेती औजारांचा वापर, आदींद्वारे एकरी उत्पादकता वाढविणे शक्य आहे. असे प्रतिपादन वसंतदादा शुगर इंस्टिट्यूटचे ऊस तज्ञ डॅा. आर. एन. गायकवाड यांनी केले आहे. 

लिंगाळी (ता. दौंड) येथे आज (ता. 5) सकाळ - अॅग्रोवन, लिंगाळी ग्रामपंचायत व दौंड शुगर लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने ऊस व्यवस्थापन तंत्रज्ञानासंबंधी चर्चासत्रात डॅा. आर. एन. गायकवाड बोलत होते. दौंड शुगरचे संचालक वीरधवल जगदाळे, सरपंच सुनीता येडे, माजी सरपंच सुहास जगदाळे, दौंड शुगरचे मुख्य शेतकी अधिकारी दीपक वाघ, ऊस विकास अधिकारी संदेश बेनके, उपसरपंच गणेश जगदाळे, लिंगाळी ग्रामपंचायत सदस्य लालासाहेब जगदाळे, गुलाब काळे, गोपाळवाडीचे ग्रामपंचायत सदस्य नारायण सूळ, आदी यावेळी उपस्थित होते. अॅग्रोवनचे क्षेत्रिय सहायक भालचंद्र लोणकर यांनी प्रास्ताविक केले. 

डॅा. आर. एन. गायकवाड म्हणाले, उसाचे शास्त्र व अर्थशास्त्र समजावून घेतले पाहिजे. उसासाठी ठिबक सिंचन पध्दतीचा अवलंब केल्यास उत्पादनात वाढ होण्यासह पाण्याची व खतांची देखील बचत होते. पिकाच्या गरजेनुसार पाणी दिल्यामुळे कालांतराने जमीन नापीक किंवा क्षारपड होण्याची शक्यता राहत नाही. पूर्वहंगामासाठी व्हीएसआय 8005 ही व्हरायटी वापरावी.

वीरधवल जगदाळे यांनी सकाळ - अॅग्रोवन यांचे ऊस व्यवस्थापन चर्चासत्र हे एक प्रकारचे संस्कार असल्याने त्याचा लाभ घेत आधुनिक पध्दतीने शेती करण्याचे आवाहन केले. ऊस उत्पादकांच्या शंकांचे यावेळी निरसन करण्यात आले. संदेश बेनके यांनी आभारप्रदर्शन केले. 

उसाच्या उत्पादकता वाढीसाठी डॅा. आर. एन. गायकवाड यांचे उपाय
- लागवडीचे सुयोग्य नियोजन

- लागवडीची योग्य पध्दतीचा अवलंब

- सेंद्रिय व रासायनिक खतांचा संतुलित वापर

- पाण्याचा नियोजनबध्द वापर 

- लागणी ते तोडणी पर्यंत आंतर मशागत

- तणनियंत्रण

-  सुयोग्य बांधणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com