Video : सततच्या पावसामुळे खानावळीत भाज्यांचा दुष्काळ 

Use Of Vegetable is Decreasing in Mess due to continuous rainfall in pune
Use Of Vegetable is Decreasing in Mess due to continuous rainfall in pune

पुणे : खानावळीत पनीर, मशरूमचा "मेनू' बघायचं म्हटलं तरीही चार-महिने वाट पाहावी लागत असायची. पण, हाच मेनू आता पंधरा दिवसांत दोनदा मिळतोय. तर काही ठिकाणी फळभाज्या, पालेभाज्या यांना वगळून नुसत्याच कडधान्याची भाजी मिळतेय. 

जंगली महाराज रस्त्यावरच्या पावभाजीवाल्यानेही काकडी आणि लिंबाची 'साइज' कमी केलीय, तर डेक्कनच्या काकांकडे काकडी खिचडी नाही तर खिचडीच मिळतेय. खानावळीपासून रस्त्यावरच्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडे महागलेल्या भाज्यांचा दुष्काळ दिसतोय. त्यामागंचं कारण आहे, सततचा मुसळधार पाऊस. 

पुणे जिल्ह्यासह सर्वत्र पावसाचा मुक्काम लांबल्याने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचा सर्वाधिक फटका हा फळ आणि पालेभाज्यांना बसला. अनेक ठिकाणी शेतातच भाजीपाला कुजला आहे. तर काही ठिकाणी त्याचा दर्जा खालावला आहे. त्यामुळे गुलटेकडी मार्केट यार्डात भाज्यांची आवक मंदावली आहे. त्याचा परिणाम बहुतांशी भाज्यांच्या भावाने 'शंभरी' गाठली, तर काही भाज्यांचा एका किलोचा भाव दीडशे रुपयांच्या घरात गेला आहे. त्या वेळी भाज्यांची कमतरता आणि त्यांच्या भावाचा पुण्यात कुठे काय परिणाम झाला आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. 

खानावळीत जेवणासाठी आलेला तुषार कळसकर म्हणाला, "पालेभाज्यांऐवजी कडधान्ये खावी लागत आहेत. काकडीऐवजी मुळा दिला जातोय. एका मांसाहारी उपाहारगृहात कांद्यासाठी जादा पैसे घेत आहेत. त्यामुळे जेवणावर जादा खर्च करावा लागतो आहे.'' 

आमच्या मेसमध्ये पनीर, मशरूमच्या भाज्या फारशा कधी मिळत नव्हत्या. मात्र, त्या आता मिळत आहेत. मात्र, पालेभाज्यांचे प्रमाण खूपच कमी झालेले आहे, असे रोहन सोमवंशी यांनी सांगितले. 

खानावळी आणि छोट्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांना महागड्या भाज्यांचा फटका बसतो. त्याचा परिणाम मोठ्या हॉटेल्सना जाणवत नाही. मात्र, महागलेल्या भाज्यांबाबत याही हॉटेलचालकांना चिंता आहे. मथुरा हॉटेलचे प्रसाद जाधव म्हणाले, "भाज्यांच्या वाढत्या दरामुळे मेथी, वांगी, आळू घेणे परवडत नाही. पावसामुळे भाज्या किडल्या असण्याचीही शक्‍यता असते. परंतु, त्याचा व्यवसायावर काही परिणाम झाला नाही.'' 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com