बॅंकिंग परीक्षांसाठी उपयुक्त  पुस्तकाचे गुरुवारी प्रकाशन

बॅंकिंग परीक्षांसाठी उपयुक्त  पुस्तकाचे गुरुवारी प्रकाशन

पुणे - बॅंकिंग व विमा क्षेत्रातील परीक्षांसाठी उपयुक्त असलेल्या सकाळ प्रकाशनच्या इंग्रजी भाषेतील पुस्तकाचे गुरुवारी (ता. २१) प्रकाशन होणार आहे. बुधवार पेठेतील ‘सकाळ’च्या कार्यालयात सकाळी अकरा वाजता हा प्रकाशन सोहळा पार पडेल. 

महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. या वेळी बॅंकिंग क्षेत्रातील करिअर निवडीचे महत्त्व आणि तयारी या विषयावर अनास्कर आणि पुस्तकाच्या सहलेखिका वंदना धर्माधिकारी यांचे व्याख्यान होणार आहे. बॅंक पीओ, क्‍लार्क, एलआयसी अस्टिटंट या कर्मचारी, लिपिक आणि अधिकारी प्रवर्गातील पदांच्या पूर्व व मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे. 

परीक्षांच्या नव्या पॅटर्ननुसार ‘सकाळ कॉम्प्रेसिव गाइड टू आयबीपीएस बॅंक पीओ, क्‍लर्क ॲण्ड एलआयसी प्रीलीम मेन एक्‍झाम’ या पुस्तकाची मांडणी व रचना केली आहे. इंग्रजी व्याकरण, बुद्धिमापन चाचणी, मूलभूत गणित, कॉम्प्युटर, बॅंकिंग आणि आर्थिक घटक, सामान्य ज्ञान या विषयांच्या अद्ययावत व परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त माहितीचा समावेश यात आहे. सराव प्रश्नांचा या पुस्तकात समावेश आहे. बॅंकिंग व आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञ वंदना धर्माधिकारी, संतोष वडक पाटील, प्रा. कृष्णा कुलकर्णी, तसेच इंग्रजी व कॉम्प्युटर विषयांच्या तज्ज्ञ प्रा. आम्रपाली औरंगाबादकर, वल्लरी धर्माधिकारी हे या पुस्तकाचे लेखक आहेत. सकाळ प्रकाशनाची इतर दर्जेदार पुस्तके कार्यक्रमस्थळी सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com