सुरक्षितपणे सूर्यग्रहण पाहायचंय; इथे मिळतील तुम्हाला सौरचष्मे!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 डिसेंबर 2019

नागरिकांनी सूर्यग्रहण पाहण्यासाठी काळी काच, एक्‍स रे यांचा वापर न करता 'कुतूहल'ने सूर्यग्रहण पाहण्यासाठी सर्वांत सुरक्षित सौरचष्मे बनविले आहेत.

पुणे : तब्बल दशकानंतर भारतातून सूर्यग्रहण दिसणार आहे. येत्या 26 डिसेंबरचे कंकणाकृती सूर्यग्रहण कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू राज्यांतील काही शहरांमधून दिसणार आहे. उर्वरित संपूर्ण भारतातून खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या सूर्यग्रहणाचे महत्त्व लक्षात घेता अधिकाधिक विद्यार्थी, पालक व नागरिकांनी सुरक्षितपणे ग्रहण पाहावे, असे आवाहन 'सकाळ वृत्त समूह' व 'संडे सायन्स स्कूल'च्या वतीने करण्यात आले आहे. 

- पुणे : साडेचार हजार कोटींच्या निविदांची होणार चौकशी; 'सकाळ'च्या वृत्ताची गंभीर दखल!

नागरिकांनी सूर्यग्रहण पाहण्यासाठी काळी काच, एक्‍स रे यांचा वापर न करता 'कुतूहल'ने सूर्यग्रहण पाहण्यासाठी सर्वांत सुरक्षित सौरचष्मे बनविले आहेत. या वेळी 'कुतूहल'ने अमेरिकेतील प्रसिद्ध थाऊसंड ओक्‍स यांचे आयएसओ प्रमाणित फिल्टर्स वापरून सौरचष्मे तयार केले आहेत. ज्यात सूर्यापासून येणारे अतिनील व अवरक्त प्रारणे शोषली जातात. कुतूहल निर्मित आयएसओ प्रमाणित गॉगल वापरूनच सूर्यग्रहण पाहावे.

- Mumbai Metro 3 प्रकल्पाच्या पाहणीनंतर मंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत...

सध्या बाजारामध्ये अल्युमिनियम फॉइल वापरून तयार केलेले स्वस्त गॉगल उपलब्ध आहेत, मात्र ते सुरक्षित नाहीत, नागरिकांनी असे असुरक्षित गॉगल वापरू नयेत, अशी माहिती 'कुतूहल-संडे सायन्स स्कूल'चे संचालक सुयश डाके व दिनेश निःसंग यांनी दिली. 

- 'एअर इंडिया'ला सुरक्षा यंत्रणेतून दरवर्षी 23 कोटींचे उत्पन्न

सौरचष्मे मिळण्याचे ठिकाण 
- सकाळ कार्यालय व निवडक चष्म्याची व अन्य दुकानांमध्ये उपलब्ध 
- किंमत : 60 रुपये प्रतिचष्मा 
- आपल्या नजीकच्या दुकानात गॉगल उपलब्धतेसाठी 8779678709 / 9373035369 / 9850047933 या क्रमांकावर 'गॉगल' हा शब्द मेसेज अथवा व्हॉट्‌सऍप करावा.

No photo description available.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: By using solar goggles watch the solar eclipse safely