भारतीय संस्कृतीच्या साक्षरतेसाठी ‘युटिक्स’

पुणे विद्यापीठ ः सामंजस्य करारप्रसंगी (उजवीकडील) आयसीसीआरचे अध्यक्ष, खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे, कुलगुरू डॉ. नितीन करमळकर.
पुणे विद्यापीठ ः सामंजस्य करारप्रसंगी (उजवीकडील) आयसीसीआरचे अध्यक्ष, खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे, कुलगुरू डॉ. नितीन करमळकर.

आयसीसीआर, पुणे विद्यापीठात सामंजस्य करार; विविध क्षेत्रांवर ई-कंटेन्ट कॅपसूल्स
पुणे - जागतिक पातळीवर भारतीय संस्कृतीबद्दल साक्षरता निर्माण करणे व गैरसमज दूर करणे यासाठी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (आयसीसीआर) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे युनिव्हर्सलायजेशन ऑफ ट्रॅडिशनल इंडियन नॉलेज सिस्टिम्स (युटिक्स) हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या माध्यमातून विविध क्षेत्रांवर ई-कंटेन्ट कॅपसूल्स तयार करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. 

आयसीसीआरचे अध्यक्ष खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे, कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी या करारावर स्वाक्षरी केली. या वेळी आयसीसीआरच्या वित्त समितीचे अध्यक्ष दीपक करंजीकर, विद्यापीठाच्या सेंटर फॉर इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड एन्टरप्रायझेस विभागाच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर, उपक्रमाचे कंटेन्ट डिरेक्टर श्रीरंग गोडबोले, अभिनेते राहुल सोलापूरकर, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, प्रसेनजित फडणवीस उपस्थित होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पत्रकार परिषदेत सहस्रबुद्धे म्हणाले, ‘भारत म्हणजे काय?, भारतीय संस्कृती, त्याचे तत्वज्ञान काय आहे हे जगभरातील लोकांना समजणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘युटिक्स’ हा उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये सध्या भरत शास्त्र, मोहिनीयट्टम, रवींद्र संगीत, मराठ्यांचे शस्त्र आणि सैन्य यासह १५ अभ्यासक्रमांची १३ एप्रिल रोजी सुरवात केली जाणार आहे.

करमळकर म्हणाले, ‘भारतात यापूर्वी गणित, शल्यचिकित्सका यावर अभ्यास झालेला आहे. सुमारे ८०० वर्षांपूर्वी नालंदा विद्यापीठाचे कार्य सुरू होते. हा इतिहास काळाच्या ओघात लुप्त झाला होता ही माहिती समोर आणण्याचा प्रयत्न या सामंजस्य करारातून केला आहे.’

पुणे विद्यापीठात व्हिडिओ निर्मिती
पुणे विद्यापीठाअंतर्गत असलेल्या ई-कंटेन्ट डेव्हलपमेंट अँड लर्निंग इनोव्हेशन सेंटर या माध्यमातून या उपक्रमाची निर्मिती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या सेंटरने यापूर्वी १ हजार ३०० पेक्षा जास्त व्हिडिओ तयार केले आहेत. विद्यापीठातील विविध विभाग आणि विद्यापीठाशी संलग्न संस्थांकडे असलेले ज्ञान आणि अनुभव या उपक्रमाच्या निर्मितीत महत्त्वाचे घटक असणार आहेत. 

अनेक भाषांमध्ये साहित्य उपलब्ध
कला-संस्कृती, भारतीय महाकाव्य, भारतीय वन्य जीवन, मंदिरांचे वास्तुशास्त्र, लोककला व संस्कृती, योग, भारतीय पाककला, पारंपरिक नृत्यप्रकार यांसारख्या शंभर विषयांवर अत्यंत साध्या, सोप्या आणि सर्वांना समजेल अशा ई कॉन्टेंट कॅपसुल्सच्या स्वरूपात ही माहिती उपलब्ध होईल. यामध्ये प्रेझेंटेशन, व्हिडिओ, वाचण्यासाठी आवश्यक माहिती, क्वीझ आदी बाबींचा समावेश असेल. किमान दोन तासाचे हे कॅपसुल्स सध्या इंग्रजी भाषेत उपलब्ध होते. भविष्यात जर्मन, फ्रेंच, रशियन आणि चीनी भाषेत उपलब्ध होतील.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com