उत्तम सदाकाळ यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

दत्ता म्हसकर
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

सदाकाळ हे विद्यार्थी प्रिय,उपक्रमशील प्राथमिक शिक्षक म्हणून सव्वीस वर्षांपासून कार्यरत असून त्यांनी शिक्षण, कला, तसेच साहित्य क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. शैक्षणिक कारकिर्दीत विदयार्थी घडवत असताना मुलांसाठी बालसाहित्याची निर्मिती त्यांनी केली आहे. बाल साहित्यिक असलेल्या उत्तम सदाकाळ यांची  बाल साहित्यासह एकूण 64 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. 

जुन्नर : करंजाळे ता.जुन्नर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक उत्तम सदाकाळ यांना यंदाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.   

सदाकाळ हे विनोदी लेखक व बालसाहित्यिक म्हणून परिचित आहेत. सकाळच्या गुदगुल्या सदरात त्यांच्या अनेक विनोदी कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. सद्या ते  करंजाळे येथे पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. 

सदाकाळ हे विद्यार्थी प्रिय,उपक्रमशील प्राथमिक शिक्षक म्हणून सव्वीस वर्षांपासून कार्यरत असून त्यांनी शिक्षण, कला, तसेच साहित्य क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. शैक्षणिक कारकिर्दीत विदयार्थी घडवत असताना मुलांसाठी बालसाहित्याची निर्मिती त्यांनी केली आहे. बाल साहित्यिक असलेल्या उत्तम सदाकाळ यांची  बाल साहित्यासह एकूण 64 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. 

यापूर्वी उत्तम सदाकाळ यांना अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यामध्ये तालुका गुणवंत शिक्षक पुरस्कार, आदर्श शिष्यवृत्ती शिक्षक पुरस्कार, पुणे जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार, ज्ञानप्रेरणा पुरस्कार, युवा साहित्यिक समाजगौरव पुरस्कार, उत्कृष्ट बालसाहित्यिक पुरस्कार, यशवंत पुरस्कार, तसेच शिवांजली भूमिपुत्र पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले आहे. या यशाबद्दल सदाकाळ यांचे शिक्षण क्षेत्र, कला व साहित्यिक क्षेत्र, तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Web Title: Uttam Sadakal gets best teacher award