उत्तम सदाकाळ यांना "कवयित्री शांता शेळके साहित्य गौरव पुरस्कार" जाहीर

दत्ता म्हसकर
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

जुन्नर - मढ ता.जुन्नर येथील साहित्यिक, कवी, व्याख्याते व दैनिक सकाळ मधील गुदगुल्या सदराचे विनोदी लेखक उत्तम सदाकाळ यांना 'कवयित्री शांता शेळके साहित्य गौरव पुरस्कार' जाहीर झाला आहे. 

जुन्नर - मढ ता.जुन्नर येथील साहित्यिक, कवी, व्याख्याते व दैनिक सकाळ मधील गुदगुल्या सदराचे विनोदी लेखक उत्तम सदाकाळ यांना 'कवयित्री शांता शेळके साहित्य गौरव पुरस्कार' जाहीर झाला आहे. 

उत्तम सदाकाळ यांच्या "तुझ्याबिगर करमेना" या विनोदी कथासंग्रहासाठी 2017 साठीचा हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे. कवयित्री शांता शेळके प्रतिष्ठान, मंचर, पुणे या साहित्य संस्थेच्या वतीने 2017साठीचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. शुक्रवार ता.21 रोजी मंचर, ता.आंबेगाव येथे आयोजित सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण होणार आहे  खा.शिवाजीराव आढळराव पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रभारी कार्यवाह प्रकाश पायगुडे, मसाप साहित्य पत्रिकेचे संपादक डॉ. पुरुषोत्तम काळे, ज्येष्ठ साहित्यिक बबन पोतदार यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे अशी माहिती कवयित्री शांता शेळके प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्ता पायमोडे दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: uttam Sadakal has declared "Poetry Shanta Shelke Literary Gaurav Award"