बालमृत्यूच्या जोखडातून वावर-वांगणी मुक्त

भगवान खैरनार
शनिवार, 19 जानेवारी 2019

मोखाडा :  सन 1992 - 93  साली त्यावेळी मोखाड्यात असलेल्या वावर-वांगणी येथे 125  हुन अधिक कुपोषण आणि भूकबळीने बालमृत्यू झाल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. त्यानंतर शासनाची संपूर्ण यंत्रणा येथे कामाला लागली होती. मात्र, बालमृत्यू आणि कुपोषणाला आळा घालण्यात शासनाला यश आले नव्हते. परंतू स्वतंत्र पालघर जिल्हा निर्माण झाल्यानंतर येथे खऱ्या अर्थाने सर्वच यंत्रणा कामाला लागल्या , स्थानिक ग्रामपंचायत येथील नागरीकांची सतर्कता या सांघिक कामगिरीमुळे तब्बल  27  वर्षानंतर येथे एकही बालमृत्यू कुपोषणाने घडला नसल्याचा सरकारी अहवालावरून समोर आले आहे. 
 

मोखाडा :  सन 1992 - 93  साली त्यावेळी मोखाड्यात असलेल्या वावर-वांगणी येथे 125  हुन अधिक कुपोषण आणि भूकबळीने बालमृत्यू झाल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. त्यानंतर शासनाची संपूर्ण यंत्रणा येथे कामाला लागली होती. मात्र, बालमृत्यू आणि कुपोषणाला आळा घालण्यात शासनाला यश आले नव्हते. परंतू स्वतंत्र पालघर जिल्हा निर्माण झाल्यानंतर येथे खऱ्या अर्थाने सर्वच यंत्रणा कामाला लागल्या , स्थानिक ग्रामपंचायत येथील नागरीकांची सतर्कता या सांघिक कामगिरीमुळे तब्बल  27  वर्षानंतर येथे एकही बालमृत्यू कुपोषणाने घडला नसल्याचा सरकारी अहवालावरून समोर आले आहे. 

वावर - वांगणी त 125 हुन अधिक बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने, राज्यात खळबळ उडाली होती. देशात तसेच युनोतही याची चर्चा झाली होती. त्यावेळी येथे तातडीने ऊपाययोजना करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी वावर वांगणीला सतत तीन दिवस भेट दिली होती. तातडीने माजी आमदार शंकर नम ऊप मंत्री पद दिले होते. अनेक सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था, कारपोरेट जगत या ठिकाणी मदतीला धावले होते. मात्र, तरीही कुपोषण आणि बालमृत्यू च्या घटना येथे घडतच होत्या. मात्र, सन   2014  मध्ये स्वतंत्र आदिवासी पालघर जिल्हा अस्तित्वात आला आणि खऱ्या अर्थाने सरकारी यंत्रणा कामाला लागली.

माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या अध्यक्षतेखाली कुपोषणाला आळा घालण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात आली. शासन स्थरावरून कुपोषित बालकांचा वाढलेला आलेख कमी करण्यासाठी शासनाच्या यंत्रणा यामध्ये अंगणवाड्या, बालवाड्या व आरोग्य विभागाकडून कुपोषित बालकांची वजने उंची घेणे, त्या कुपोषित बालकांना केळी, अंडी, रवा असा पौष्टिक आहार देणे, व गरोदर मतांनी पौष्टिक आहार देवून वारंवार त्या गरोदर मातांची तपासणी करणे, तसेच या कुपोषित झोनकडे डॉक्टर, नर्स, मदतनीस, आशा वर्कर, यांचे गांभीर्यपूर्वक लक्ष घालून वावर वांगणीतील कुपोषित बालकांचा आलेख कमी झाला असून, वर्षभरात एकही बालकाचा मृत्यू झाला नसल्याचे साखरशेत प्राथमिक केंद्राचे वैद्यकीय अधिकारी किशोर देसले यांनी सांगितले. 

 मात्र शासनाच्या परिपूर्ण योजना ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी व नागरिकांचा मोठा सहभाग यामुळे वावर वांगणीतील कुपोषणाला आळा घालण्याचे 
काम केले असल्याचे निदर्शनास आले आहे. कुपोषण कमी करायचे असेल तर एकमेव उपाय कायम स्वरूपी रोजगार हे लक्षात घेवून वावर वांगणीतील लोकप्रतिनिधी, सरपंच, सदस्य, ग्रामस्थ यांनी एकच निर्धार घेवून मोठ्या प्रमाणात रोजगार हमी योजनेतून कामे काढली, रोजगाराची सरकारकडे सतत मागणी करून रोजगार निर्मिती करणे हे लक्षात घेवून, नागरिकांनी प्रगती साधली. या वावर वांगणीने मागील वर्षात रोजगार हमी मनुष्यदिन निर्मितीत सगळ्यात अधिक रोजगार कोकण विभागातून वावर वांगणीला मिळाला होता. वावर वांगणी रोजगार हमी मनुष्यदिन निर्मितीत वावर वांगणी कोकण विभागातून प्रथम आल्याचा पुरस्कार देखील मिळाला आहे.

वावर वांगणीतील कुपोषण कमी करण्यासाठी शासनाच्या प्रयत्नाबरोबरच तेथील नागरिकांचा मोठा सहभाग असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. त्यामुळेच  27  वर्षानंतर वावर वांगणीतील कुपोषणाचा आलेख कमी झाला आहे. आणि वर्षभरात एकही बालकाचा कुपोषणामुळे मृत्यू झाला नसल्याचा सरकारी अहवाल सांगतो आहे. सध्या या परिसरात एकूण तीव्र कुपोषित बालके 22  व  अतितीव्र कुपोषित 4  बालके  आहेत. 
त्यामुळे वावर वांगणीत कामे करना-या शासन 
यंत्रणेचे अभिनंदन होत आहे.

''कुपोषणाला आळा घालण्यासाठी आणि एकही बालमृत्यू होऊ नये म्हणून मी टास्क फोर्स चा अध्यक्ष झाल्यानंतर वर्षभरात पालघर जिल्हयात तब्बल   18  भेटी देऊन, प्रत्यक्ष पाहणी करून वेळोवेळी आढावा घेतला आहे. आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण, आदिवासी विकास विभाग, महसूल विभाग, स्वयंसेवी व सामाजिक संस्था, स्थानिक ग्रामपंचायती तेथील नागरिक यांच्या सांघिक प्रयत्नामुळे वावर-वांगणी त वर्षभरात एकही बालकाचा कुपोषणामुळे मृत्यू झाला नाही . या सर्व यंत्रणा अभिनंदनास पात्र आहेत ''
- डाॅ. दीपक सावंत,  माजी आरोग्य मंत्री

''आमच्या आरोग्य यंत्रणेने केलेले प्रयत्न व बालविकास यंत्रणा आणि तेथील नागरिकांचा सहभाग यामुळे हे वावर वांगणीतील कुपोषणचा आलेख कमी झाल्याचे चित्र आहे. आम्हलाही त्याचा आंनद आहे.''
- किशोर देसले, प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी

Web Title: the Vaavr-Vangani Free From Infant mortality duem to Malnutrition