निरगुडसर (पुणे) : आंबेगाव तालुक्यातील कृषी विभागात तालुका कृषी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या 15 जागा रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध कृषी कर्मचाऱ्यांची धावपळ उडत आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे शेताच्या बांधावर मार्गदर्शन करताना दमछाक होत आहे.
आंबेगाव तालुक्यात मंचर, निरगुडसर, घोडेगाव, डिंभे अशी एकूण चार मंडल कृषी कार्यालय आहेत. या कार्यालयात एकूण ८४ अधिकारी व कर्मचारी आहे. त्यातील १५ जागा रिक्त आहेत. त्यातील काही जागा अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. सरकारच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्याचे व राबवण्याचे काम खऱ्या अर्थाने क्षेत्रीय स्तरावरील कृषी सहायक हे करत असतात. परंतु, या स्तरावर काम करणाऱ्या कृषी सहायकांची संख्याही अपुरी आहे. तसेच, तीन ठिकाणी कृषी सहायकांना मंडल कृषी अधिकारी, असा अतिरिक्त कारभार संभाळावा लागत आहे. तालुका कृषी अधिकारी १, मंडल कृषी अधिकारी ३ (मंचर, घोडेगाव व निरगुडसर), कृषी पर्यवेक्षक ५ (घोडेगाव २, मंचर २, निरगुडसर १), कृषी सहायक ६ (वडगाव पीर, लोणी, शिंगवे, पिंपळगाव खडकी, गिरवली, महाळुंगे पडवळ) अशा एकूण १५ जागा तालुक्यात रिक्त आहेत.
काय सांगता, पुणे झेडपीला डाॅक्टर आणि नर्स मिळेना...
आंबेगाव तालुक्यात कृषी विभागातील अपुऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे शेतकऱ्यांना शेतीविषयक योजना व पीकविषयक मार्गदर्शन करण्यास उपलब्ध कृषी कर्मचाऱ्यांची तारांबळ होताना दिसत आहे. त्यामुळे रिक्त जागा तातडीने भरण्याची मागणी शेतक-यांनी केली आहे.
निरगुडसर येथील पद साडेतीन वर्षापासून रिक्त
निरगुडसर मंडल कृषी कार्यालयांतर्गत २८ गावे येतात. या मंडलात मंडल कृषी अधिकारी (१) ,पर्यवेक्षक (१), कृषी सहायकांची ३, अशी एकूण ५ पदे रिक्त आहेत. त्यामध्ये साडेतीन वर्षापासून मंडल कृषी अधिकारी पद रिक्त आहे. या गावांमध्ये राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, उन्नत शेतीअभियान, जलयुक्त शिवार, फळबाग, कांदा चाळी आदी शेतकऱ्यांच्या हिताच्या योजनांची मागणी या मंडळात अधिक प्रमाणात असते. त्यामुळे या ठिकाणी रिक्त असणारी पदे शासनाने तातडीने भरावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
Edited By : Nilesh J Shende
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.