कृषी अधिकाऱ्यांच्या रिक्त पदामुळे शेतकरी झाले त्रस्त

दत्ता म्हसकर
गुरुवार, 28 जून 2018

जुन्नर (पुणे) : तालुक्यात मंडल कृषी अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने ऐन खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना  कृषी विभागाच्या योजनांपासून वंचित राहण्याची पाळी आली आहे.

तालुका कृषी कार्यालयातील चार मंडल कृषी अधिकाऱ्यापैकी तीन जणांची ऑनलाईन बदली झाली. त्यांच्या जागी अन्य कर्मचारी न आल्याने या तीन जागा ऑफलाईन झाल्या आहेत. तर कृषी सहायकाच्या 48 पैकि 12 पदे बदली अथवा सेवानिवृत्त झाल्याने रिक्त आहेत. 

शेतीप्रधान जुन्नर तालुक्यात खरीप हंगामात कृषी विभागाकडुन शेतकर्याना मार्गदर्शनाची सुविधा राहिली नसल्यांची खंत शेतकरी व्यक्त करीत आहेत.तालुक्यात कृषी विभागाची जुन्नर,नारायणगाव,बेल्हे व ओतूर अशी एकूण चार मंडळ कार्यालये आहेत.यापैकी ओतूरचे कार्यालय असून अडचण नसून खोंळबा अशा स्थितीत आहे,कारण ते बहुतेक वेळा शेतकऱ्यांना बंदच आढळते. ओतूर व परिसरातील शेतकरी नेहमीच या बंद कार्यालयाने त्रस्त झालेले दिसतात.

ओतूरचे कार्यालय नेहमीच बंद असल्याची तक्रार आहे तर उर्वरित कार्यालयात आता अधिकाऱ्याची वानवा झाली आहे. पन्नास ते सत्तर गांवासाठी एक मंडळ कृषी अधिकारी, तर पाच ते सात गावांसाठी एका सहायकाची नियुक्ती केली जाते.खरीप हंगामातील पीक प्रात्यक्षिक तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती मंडळ कृषी अधिकार्यांमार्फत शेतकर्यांना मिळते.मात्र अधिकारीच नसल्याने आता कोणाकडे विचारणा करावी,असा शेतकर्याना प्रश्न पडला आहे.कृषी यांत्रिकीकरण, कांदाचाळ आदी योजनांची कामे खोळंबली आहेत.

Web Title: vacant post of agriculture officer problematic to farmers