जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांचे कोरोना लसीकरण करा - जिल्हाधिकारी

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अठरा ते ४४ या वयोगटातील सर्व दिव्यांगांचे कोरोना लसीकरण पूर्ण करा.
Dr Rajesh Deshmukh
Dr Rajesh DeshmukhSakal

पुणे - पुणे जिल्ह्याच्या (Pune Distirct) ग्रामीण भागातील (Rural Area) अठरा ते ४४ या वयोगटातील सर्व दिव्यांगांचे (Disable) कोरोना लसीकरण (Vaccination) पूर्ण करा, असा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Dr Rajesh Deshmukh) यांना जिल्हा परिषद प्रशासनाला (ZP Administrative) दिला आहे. या लसीकरणाच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार काम करावे. यासाठी लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवावी आणि याबाबतचे काटेकोरपणे नियोजन करावे, अशी सूचना त्यांनी यावेळी केली. (Vaccinate all Disabled Pune District with Corona Dr Rajesh Deshmukh)

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कोविड आजार व लसीकरण मोहीमेबाबतच्या जिल्हा कृतिदलाची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत त्यांनी हा आदेश दिला. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रेय मुंडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार आदी उपस्थित होते.

Dr Rajesh Deshmukh
पुणे : विद्यापीठाची द्वितीय सत्र परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये होणार

जिल्हा परिषदेच्यावतीने याआधी १४ जून २०२१ रोजी पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील दिव्यांगांच्या कोरोना लसीकरणासाठी खास मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेत ४५ वर्षांपुढील सर्वांना कोरोना लस देण्याचे नियोजन केले होते. मात्र यात १८ ते ४४ वयोगटातील दिव्यांगांना तांत्रिक अडचणीमुळे कोरोना लस देता आली नव्हती. या खास मोहिमेत २ हजार ४०२ दिव्यांगांना पहिला किंवा दुसरा डोस देण्यात आला.

पुणे जिल्ह्यात २८ हजार ७७७ दिव्यांग आहेत. यामध्ये १८ ते ४४ वर्षे वयोगटातील दिव्यांगांची संख्या मोठी आहे. त्यामुळे दिव्यांगांच्या लसीकरणासाठी खास मोहीम राबवूनही सुमारे २४ हजार दिव्यांगांना केवळ वयाच्या अडचणीमुळे ही लस देता येऊ शकली नाही. त्यासाठी १८ ते ४४ वयोगटातील दिव्यांगांच्या लसीकरणासाठी खास लसीकरण मोहीम राबविण्याची गरज होती. ती गरज आता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे पूर्ण होऊ शकणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com