पुण्यात आज १८४ ठिकाणी लसीकरण

प्रत्येक केंद्रावर १०० डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
Corona Vaccine
Corona VaccineSakal
Summary

प्रत्येक केंद्रावर १०० डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

पुणे : शासनाकडून कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन लशीचे डोस उपलब्ध झाल्याने महापालिकेने सोमवारी (ता. १४) १८४ केंद्रांवर लसीकरण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक केंद्रावर १०० डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शहरात लसीकरण सुरू झाल्यापासून प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरण केंद्र सुरू ठेवले जाणार आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. (vaccination at 184 places in pune today)

शासनाकडून महापालिकेला कोव्हिशिल्डचे ११ हजार, तर कोव्हॅक्सिनचे दोन हजार ३०० डोस उपलब्ध झाले आहेत. महापालिकेकडे काही डोस शिल्लक आहेत. त्याद्वारे सोमवारसाठी महापालिकेने लसीकरणाचे नियोजन केले आहे.

Corona Vaccine
उद्योगांना ऑक्सिजन पुरविण्यास केंद्राची परवानगी; राज्याची आडकाठी

नगरसेवकांचे केंद्र सुरू

आपल्या प्रभागात लसीकरण केंद्र सुरू व्हावे, यासाठी नगरसेवकांनी प्रशासनावर दबाव आणला होता. त्यानंतर प्रत्येक नगरसेवकाने सुचविलेल्या ठिकाणी एक केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, लस उपलब्ध नसल्याने अद्याप अनेक केंद्र सुरूच होऊ शकली नव्हती. त्यामुळे पुन्हा नगरसेवकांनी लशीसाठी तगादा सुरू केला. त्यामुळे सोमवारी नगरसेवकांनी सुचविलेल्या सर्वच केंद्रासह इतर केंद्रावर लस पुरविली गेली आहे.

असे असेल लसीकरण -

कोव्हिशिल्ड -

- २२मार्च रोजी पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा डोस मिळणार

- ४५ वयाच्या पुढील नागरिकांच्या पहिल्या डोससाठी ६० लस ऑनलाइन बुकिंगसाठी राखीव

- उर्वरित ४० टक्के लस दुसरा डोस आणि फ्रंटलाइन कर्मचारी, दिव्यांग, स्तनदा माता, थेट केंद्रावर आलेले नागरिक यांच्या पहिल्या डोससाठी असेल

कोव्हॅक्सिन -

- १६ मे पूर्वी पहिला डोस घेतलेल्या १८ वयाच्या पुढील सर्वांना दुसरा डोस मिळेल

- ४० टक्के लस थेट केंद्रावर येणाऱ्या नागरिकांसाठी राखीव

- ६० टक्के लस ऑनलाइन बुकिंगसाठी

- ऑनलाइन बुकिंग सोमवारी सकाळी आठ वाजता सुरू होईल

Corona Vaccine
भारतीय नौदलात अधिकारीपदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com