वाचनकट्ट्यात स्त्रीसाहित्याचा आस्वाद

पुणे नगर वाचन मंदिर - ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानतर्फे ‘दिवाळी अंकांतील स्त्री साहित्य’ यावर वाचनकट्ट्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विद्यार्थी व मान्यवर.
पुणे नगर वाचन मंदिर - ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानतर्फे ‘दिवाळी अंकांतील स्त्री साहित्य’ यावर वाचनकट्ट्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विद्यार्थी व मान्यवर.

पुणे - ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानतर्फे ‘दिवाळी अंकांतील स्त्रीसाहित्य’ यावर वाचनकट्ट्याचे आयोजन करण्यात आले होते. विविध दिवाळी अंकांतील कथा व कवितांचे वाचन करण्यात आले.

साडेसतरानळी येथील जिल्हा परिषद शाळेतील सातवीचे विद्यार्थी यात सहभागी झाले होते. प्रवीण साहेबराव शिंदे याने ‘छात्र प्रबोधन’च्या सुबोध दिवाळी विशेषांकातील सुमन नवलकर यांनी लिहिलेल्या ‘पांघरूण’ कथेने सुरुवात केली. विक्रम बळूरे याने ‘छात्र प्रबोधन’च्या सुबोध दिवाळी अंकातील ‘डिजिटल इंडिया म्हणजे काय?’ या लेखाचे अभिवाचन केले. अशोक पांचाळ याने ‘साधना’ या अंकातील ‘सोनं’ या धातूबद्दलची माहिती वाचली. नेहा जाधव हिने ‘साधना’तील हीना कैसर खान पिंजरलिखित ‘तांड्यातून एव्हरेस्टवर’ या लेखाचे अभिवाचन केले.

मीनल चौधरी यांनी ‘रोहिणी’ अंकातील फेसबुकचे जनक ‘मार्क झुकेरबर्ग’ यांच्या पत्नी डॉ. प्रिसिला चान यांच्या जीवनावरील सुवर्णा दिवेकरलिखित ‘फ्रॉम नथिंग टू एव्हरिथिंग’ हा लेख सादर केला. शारदा पानगे यांनी ‘सत्यशोधक’ अंकातील स्वलिखित ‘स्त्रीभ्रूणहत्या’ ही भावस्पर्शी कथा सादर केली.स्वराली चिंबळकर हिने कविता सादर केली. माधवी चिंबळकर यांनी ‘दृष्टी श्रुती ग्रुप’ अंकातील ‘नव्वदीतली लता’ हा लेख सादर केला. प्रदीप शेटे यांनी ‘हेमांगी’ दिवाळी अंकातील ‘स्त्रीशक्ती’ ही कविता सादर केली.

हीना दोशी यांनी ‘अंबर’ अंकातील श्रीमती दीपाली गोकर्णलिखित ‘संत कान्होपात्रा’ यांच्यावरील लेखाचे अभिवाचन केले. मनोज खांडरे यांनी ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानच्या दिवाळी ई-विशेषांकातील ‘निसर्ग आणि पर्यावरण ः वास्तव आणि अपेक्षा’ या निवेदिता खांडेकरलिखित प्रबोधनपर वैचारिक लेखाचे अभिवाचन केले. 

प्रमुख पाहुण्या सरिता बापट यांनी स्त्रीसंरक्षणाची माहिती दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. अर्चना चव्हाण यांनी विशेष प्रयत्न केले. सीमा वर्तक यांनी सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com