गुलाबच शेतकऱ्यांचा व्हॅलेंटाइन

ज्ञानेश्‍वर वाघमारे
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

वडगाव मावळ - ‘व्हॅलेंटाइन डे’साठी मावळ तालुक्‍यातून सुमारे दीड कोटी गुलाबांच्या फुलांची निर्यात झाली असून, स्थानिक बाजारपेठेतही एक कोटींहून अधिक फुले विक्रीला गेली आहेत. या व्यवसायात यंदा सुमारे पंचवीस ते तीस कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. दर्जेदार फुलांचे उत्पादन, विक्रमी निर्यात, मिळालेला चांगला दर या बाबी लक्षात घेता तालुक्‍यातील फूल उत्पादक शेतकरी व कंपन्यांसाठी गेल्या चार-पाच वर्षांतील हा सर्वांत चांगला हंगाम मानला जात आहे.

व्हॅलेंटाइन डेसाठी परदेशात फुले पाठविण्यास २५ जानेवारीला सुरवात झाली. ८ फेब्रुवारीला शेवटची निर्यात करण्यात आली. त्यानंतर स्थानिक बाजारपेठेत फुले पाठविण्यास सुरवात झाली. यंदा अनुकूल हवामानामुळे मागणीप्रमाणे पुरवठा झाला. दर्जेदार उत्पादनामुळे यंदा परदेशात फुलांना चांगली मागणी होती. दरही चांगला मिळाला. स्थानिक बाजारपेठेतही फुलांना प्रचंड मागणी होती.

व्यापाऱ्यांनी मिळेल तेवढा माल उचलण्याची तयारी दाखवली होती. निर्यात जास्त झाल्याने स्थानिक बाजारपेठेत फुलांचा तुटवडा निर्माण होईल, अशी शक्‍यता वर्तविण्यात आली होती; परंतु शेवटच्या काही दिवसांत ढगाळ हवामान तयार झाले. हे हवामान इतरत्र त्रासदायक ठरले असताना फूल उत्पादकांसाठी मात्र ते पर्वणीच ठरले. कारण, या उष्ण हवामानामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणावर निघाले व स्थानिक बाजारपेठेतही मागणीप्रमाणे पुरवठा करता आला. 

स्थानिक बाजारपेठ
२० फुलांच्या बंचला सरासरी मिळालेला दर २०० ते २१० रुपये. 
बाजारपेठ -दिल्ली, कोलकता, मुंबई, चंडीगड, रायपूर, कानपूर, भोपाळ, जयपूर, सुरत, अहमदाबाद, पुणे तसेच मोठी शहरे 
विक्रीला गेलेली फुले सुमारे १ कोटी 
दर
 ४० सेंटिमीटर - ७.५० रुपये, 
 ५० सेंटिमीटर - ८ ते ८.५० रुपये, 
 ६० सेंटिमीटर - ९ ते ९.५० रुपये.   
 २० फुलांच्या बंचला सरासरी मिळालेला दर - १६० ते १७० रुपये. 
 उलाढाल - ८ ते ८.५० कोटी रुपये.

फुलांची निर्यात 
२५ जानेवारी ते ८ फेब्रुवारी सुमारे १.५० कोटी
मिळालेला दर स्टेम लेंग्थ ४० सेंटिमीटर ८ रुपये
५० सेंटिमीटर ११ रुपये
६० सेंटिमीटर १३ रुपये 
निर्यात उलाढाल १७ ते १८ कोटी

Web Title: vadgaon maval news pune news red rose farmer valentine day