Vidhan Sabha 2019 : वडगाव शेरी मतदारसंघात दुपारी 3 पर्यंत 28 टक्के मतदान 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

पुणे : वडगाव विधानसभा मतदारसंघमध्ये सकाळच्या तुलनेत दुपारी मतदानाचा टक्का चांगला वाढला. दुपारी तीन वाजेपर्यंत या मतदारसंघमध्ये सत्रामध्ये दुप्पट म्हणजेच 28 टक्के मतदान झाले. तरुण, तरुणी, वृद्ध, महिलाबरोबरच दिव्यांग व्यक्तीनीही मतदान करीत आपला हक्का बजावला.

पुणे : वडगाव विधानसभा मतदारसंघमध्ये सकाळच्या तुलनेत दुपारी मतदानाचा टक्का चांगला वाढला. दुपारी तीन वाजेपर्यंत या मतदारसंघमध्ये सत्रामध्ये दुप्पट म्हणजेच 28 टक्के मतदान झाले. तरुण, तरुणी, वृद्ध, महिलाबरोबरच दिव्यांग व्यक्तीनीही मतदान करीत आपला हक्का बजावला.

वडगाव शेरी मतदारसंघामध्ये सकाळी सात वाजल्यापासूनच मतदान करण्यास नागरिकांनी प्राधान्य दिले होते. परंतु त्याचे अत्यल्प प्रमाण होते. बहुतांश मतदान केंद्रवर तुरळक गर्दी दिसत होती. सकाळी 9 पर्यंतकेवळ 3.68 टक्के मतदान झाले. त्यामध्ये सोसायट्या, उच्चभ्रु सोसायटया, बंगले परिसरातील नागरिकांची संख्या लक्षणीय होती. सकाळी व्यायामाला, बागेत फिरायला आलेल्या नागरिकांनी थेट मतदान करण्यास प्राधान्य दिले. 

9 वाजल्यानंतर मात्र मतदान केंद्र मतदाराच्या गर्दीने फुलू लागले. मतदान केंद्रबाहर असलेल्या राजकीय पक्षाच्या स्टॉलवर नागरिकांनी आपले मतदान बूथ शोधायला गर्दी केली होती. त्यानंतर हळूहळू गर्दी वाढत गेली. त्यामध्ये तरुण, महिला व तरुणीचा सहभाग लक्षणीय होता. त्यामुळे सकाळी 11 वाजेपर्यंत या मतदारसंघामध्ये सकाळच्या तुलनेत तिप्पट म्हणजे 11.72 टक्के इतके मतदान झाले.
 
दरम्यान, दुपारी बारा वाजल्यानंतर मतदार मोठ्या संखेने बाहेर पडू लागले. सकाळपासुन तुरळक गर्दी असलेल्या मतदान केंद्रवर गर्दी वाढत गेली. दुपारी जेवणाची वेळ असली तरीही, महिलावर्गाने घरातील सर्व कामे उरकून मतदानाचा हक्क बजावला. त्याचबरोबर कष्टकरी, खासगी नोकरदारही दुपारी जेवणाच्या सुट्टीचे निमित्त साधुन मतदान करण्यासाठी बाहेर पडले. त्यामुळे काही मतदान केंद्रचा अपवाद वगळता, बहुतांश ठिकाणी मतदारांच्या रांगा लागल्याचे समाधानकारक चित्र दिसून आले. त्यामुळे सकाळच्या तुलनेत दुपारी तीन वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी दुप्पट म्हणजे 28 टक्के इतकी झाली.

येरवडा येथील सुभाषनगरमध्ये राहणारे वृद्ध दाम्पत्य. लाला शिंदे, कौशल्या शिंदे. दोघेही 80-85 च्या इतके वय झालेले बुजुर्ग. पण याही वयात ते काठी टेकवत मतदान करायला आले. ''कोणाला तरी मतदान करायचेच, आपला हक्क का सोडायचा, कौशल्या शिंदे सांगत होत्या. त्यांनी या वयात मतदान करत नव्या पिढ़ीसमोर एक आदर्श घालून दिला.

स्मिता गाडे या 32 वर्षीय अपंग तरुणीने महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड येथे कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. परंतु अपंग मतदारासाठी आवश्य चांगले रॅम्पची आणखी गरज असल्याचे त्यांनी सांगितले. अन्यथा अपंग, दृष्टिहीन मतदार त्यांचा मतदानाचा हक्क कसा बजावणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Vadgaon Sheri constituency 28 per cent voting By 3 noon in Maharashtra Vidhan Sabha 2019