गुन्हेगारांची माहिती एका क्लिकवर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

वडगाव शेरी - पुणे पोलिस आयुक्तालय हद्दीतील उत्तर विभागातील तीनशे बासष्ट सराईत गुन्हेगारांची इत्थंभूत माहिती दिली आहे. तसेच गुन्हेगारापर्यंत पोचण्यासाठी स्वयंचलित नकाशा तयार करणाऱ्या येरवडा पोलिसांचा गौरव पुणे पोलिस आयुक्तांनी केला आहे. पुढील दोन दिवसांत दक्षिण विभागातील तीनशे पंचाण्णव सराईत गुन्हेगारांची माहितीही या स्वयंचलित नकाशाच्या टप्प्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील सर्व सराईत गुन्हेगारांचा शोध आता पोलिस एका क्‍लिवर घेऊ शकतील. 

वडगाव शेरी - पुणे पोलिस आयुक्तालय हद्दीतील उत्तर विभागातील तीनशे बासष्ट सराईत गुन्हेगारांची इत्थंभूत माहिती दिली आहे. तसेच गुन्हेगारापर्यंत पोचण्यासाठी स्वयंचलित नकाशा तयार करणाऱ्या येरवडा पोलिसांचा गौरव पुणे पोलिस आयुक्तांनी केला आहे. पुढील दोन दिवसांत दक्षिण विभागातील तीनशे पंचाण्णव सराईत गुन्हेगारांची माहितीही या स्वयंचलित नकाशाच्या टप्प्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील सर्व सराईत गुन्हेगारांचा शोध आता पोलिस एका क्‍लिवर घेऊ शकतील. 

येरवडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक कदम, त्यांचा मुलगा दीपेन कदम, सायबर तज्ज्ञ रियाज नदाफ यांनी तयार केलेल्या प्रकल्पाचे नाव ‘नो युवर क्रिमिनल्स’ असे असून ही माहिती ‘हिस्ट्री शिटर्स माय गुगल मॅप’ या लिंकवर उपलब्ध आहे. यासाठी पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांच्या हस्ते पोलिस निरीक्षक अशोक कदम यांना रोख पंधरा हजारांचे पारितोषिक, रियाज नदाफ, दीपेन कदम यांना प्रशस्तिपत्र आणि पोलिस कर्मचारी बाळासाहेब गायकवाड, जी. के. शिवले, जी. पी. पाटोळे, एस. डी. बांगर यांना प्रत्येकी अडीच हजार रुपयांचे पारितोषिक व प्रशस्तिपत्र देऊन गौरवण्यात आले. 

पोलिस निरीक्षक कदम यांनी सुरवातीला या प्रकल्पासाठी एक लिंक तयार केली. त्यावर येरवडा पोलिस ठाणे हद्दीतील गुन्हेगारांची माहिती अपलोड करण्यात आली. त्यामुळे गुन्हेगारापर्यंत पोचण्यासाठी पोलिसांना सर्व माहिती त्यांच्या मोबाईलवर सहज मिळू लागली. या लिंकची उपयुक्तता व सादरीकरण परिमंडळ चारचे पोलिस आयुक्त दीपक साकोरे यांच्याकडे केल्यानंतर त्यांनी पोलिस आयुक्तालयाच्या उत्तर विभागासाठीही या लिंकच्या उपयुक्ततेची माहिती वरिष्ठांना दिली. त्यानंतर उत्तर विभागातील तीनशे पासष्ट सराईत गुन्हेगारांची माहिती यावर लोड करण्यात आली.   हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त शशिकांत शिंदे, परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त दीपक साकोरे, सहायक पोलिस आयुक्त वसंत तांबे, पोलिस निरीक्षक मुकुंद महाजन यांनी मार्गदर्शन केले आहे. 

चारशे गुन्हेगारांची माहिती लोड करणे सुरू 
‘हिस्ट्री शिटर्स माय गुगल मॅप’ या लिंकवर गुन्हेगारांचे नाव, पत्ता, मोबाईल व आधार क्रमांक, तसेच त्यांच्या घरापर्यंत घेऊन जाणारा स्वयंचलित नकाशा, गुन्हेगाराच्या घराजवळच्या खाणा-खुणांचे छायाचित्र, गुन्हेगाराच्या घराचे छायाचित्र ही सगळी माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे पोलिस अगदी सहज हव्या त्या गुन्हेगारापर्यंत सहज पोचू शकतात. यानंतर पोलिस आयुक्तालयातील दक्षिण विभागातील सुमारे चारशे गुन्हेगारांची माहिती या लिंकवर लोड करण्याचे काम वेगात सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ते रविवार (ता. १३) पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर शहरातील सर्वच गुन्हेगारांची माहिती एका क्‍लिवर उपलब्ध होईल. ही लिंक केवळ पोलिसांनाच पाहता येईल.

Web Title: vadgav sheri pune news criminal information on one click