Pune : वाघोलीतील वाघेश्वर उद्यान अखेर खुले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाघोलीतील वाघेश्वर उद्यान अखेर खुले

वाघोलीतील वाघेश्वर उद्यान अखेर खुले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाघोली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर बंद असलेले वाघोलीतील वाघेश्वर उद्यान अखेर आज पासून खुले करण्यात आले. सकाळी व सायंकाळी ठराविक वेळेत हे उद्यान सुरू राहणार आहे.महापालिका उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्याने हे उद्यान खुले केले. उद्यानातील वाढलेले झाडे, गवत छाटणीला व स्वच्छतेलाही लगेच सुरुवात करण्यात आली. यासाठी दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सकाळी 6 ते 10 व सायंकाळी 4 ते 6 या दोन वेळेत उद्यान सुरू राहणार आहे.

उद्यानातील दिवे सुरू झाल्यानंतर सायंकाळची वेळ वाढविली जाणार आहे. उद्यान बंद असल्याने त्याची दुरवस्थाही झाली आहे. त्याचे वृत्तही सकाळ मध्ये प्रसिद्ध झाले होते. उद्यान खुले करण्याची मागणीश्री शिवछत्रपती प्रतिष्ठाणचे कल्पेश जाचक व शिवदास पवार यांनी महापालिका उद्यान विभागाकडे केली होती. मात्र सुरक्षा रक्षक उपलब्ध होई पर्यंत उद्यान सुरू करणार नसल्याचे उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते.

अखेर उद्यान दोन दिवसात न उघडल्यास कुलूप तोडून उद्यान खुले करण्याचा इशारा देण्यात आल्यानंतर आज उद्यान खुले करण्यात आले. उद्यान सुरू झाल्यामुळे नागरिकांचा विरंगुळा तर होईलच शिवाय व्यायाम करणाऱ्यांचीही सोय होईल.

उद्यानातील ही कामे होणे गरजेची

  1. दिवे दुरुस्त करणे

  2. स्वछतागृहाचे अपुरे काम पूर्ण करणे

  3. तुटलेली खेळणी बदलणे

  4. तुटलेले बाकडे बदलणे

  5. जॉगिंग ट्रॅक च्या बाजूला वाढलेली झाडे झुडपे काढणे.

वाघोलीतील हे एकमेव उद्यान आहे. ते बंद असल्याने त्याची दुरवस्था झाली आहे. आता ते खुले झाल्याने नागरिकांची सोय तर होईलच शिवाय उद्यान चांगले राहील. दुरुस्तीची कामेही लवकर करावी --

कल्पेश जाचक, श्री शिवछत्रपती प्रतिष्ठान.

loading image
go to top