"व्हॅलेंटाईन डे'साठी गुलाबांची मोठी आवक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

पुणे - "व्हॅलेंटाईन डे' उद्या (ता. 14) साजरा होत असून, त्यानिमित्त मार्केट यार्ड फूल बाजारात सोमवारी लाल गुलाबांची मोठ्या प्रमाणावर आवक झाली. "डच गुलाब', "साधा गुलाब' यांचा त्यात समावेश आहे. मागणी वाढल्याने त्यांच्या भावांत दहा टक्‍क्‍यांनी वाढ झाली. 

गुलाबउत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून "व्हॅलेंटाईन डे'चा कालावधी महत्त्वाचा असतो. या काळात गुलाबाची मागणी वाढते आणि भावही मिळतो. पुणे जिल्ह्यातील मावळ, हवेली, मुळशी, भोर या तालुक्‍यांतील शेतकऱ्यांसह राज्यातील काही भागांतील शेतकऱ्यांनी गुलाब पुण्यातील घाऊक बाजारात विक्रीस पाठविले होते. सुमारे 20 हजार गड्डी इतक्‍या गुलाबांची आवक झाली आहे. दरवर्षी "व्हॅलेंटाईन डे'च्या कालावधीत साधारण तीन ते पाच हजार गुलाब गड्ड्यांची आवक होत असते. मात्र, यंदा त्यात चौपट वाढ झाली आहे. स्थानिक बाजारपेठेसह दिल्ली, हैदराबाद, पश्‍चिम बंगाल येथील बाजारातही गुलाब विक्रीला पाठविला जातो. डच गुलाबाच्या एका गड्डीत वीस, तर साध्या गुलाबाच्या गड्डीत 10 ते 12 फुले असतात. त्याला अनुक्रमे 80 ते 180 रुपये आणि 20 ते 50 रुपये इतका भाव मिळाल्याचे व्यापारी सागर भोसले, बाजाराचे विभागप्रमुख एन. डी. घुले यांनी दिली. 

Web Title: valentines day pune