व्हॅलीतील भूखंडही उद्योगांना देणार

सुधीर साबळे
शुक्रवार, 18 मे 2018

पिंपरी - चुकीच्या आकारात किंवा दरीत (व्हॅलीमध्ये) असणाऱ्या जमिनींचा वापर उद्योगांसाठी करता येणे अवघड असते. मात्र, एमआयडीसीने चाकणच्या टप्पा दोनमधील अशा जमिनींचा शोध घेऊन त्या दुरुस्त करण्याचे नियोजन केले आहे. एमआयडीसीने या संदर्भातील सविस्तर प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी मुख्यालयाकडे पाठवला आहे. 

उद्योगांकडून चाकण एमआयडीसीमध्ये जमिनीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मात्र, नवीन भूसंपादन होत नसल्यामुळे नव्या उद्योगांना जागा देण्यात अडचणी येत आहेत. त्यावर उपाय म्हणून एमआयडीसीने चाकण टप्पा दोनमध्ये दरी आणि नाल्याच्या भागात असणाऱ्या भूखंडाचा शोध घेतला.

भूखंडाची दुरुस्ती कोणत्या प्रकारे झाल्यास तो उद्योगांना देणे शक्‍य होणार आहे, याचा सखोल अभ्यास केला. या भागात भराव टाकणे किंवा अन्य कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर करता येऊ शकतो का, याचीही चाचपणी करण्यात आली आहे. एमआयडीसीच्या अभियांत्रिकी विभागाकडून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. 

दरी आणि नाल्याच्या भागात असणारे भूखंड योग्य प्रकारे तयार करण्यात आले, तर उद्योगांची गरज त्यामधून पूर्ण करणे शक्‍य होणार आहे. दरी आणि नाल्याखेरीज चुकीच्या आकारात असणारे भूखंडही दुरुस्त करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 

इंजिनिअरिंग, ऑटोमोबाइल क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अनेक छोट्या उद्योगांना याठिकाणी जमीन देता येईल. 

बाधीत क्षेत्र  5,19,964 चौरस मीटर
अडकलेले भूखंड  52
दरीतील भूखंड 13
त्रिकोणी भूखंड 1
सीमाभिंत वादातील भूखंड 3
झोपडीचे अतिक्रमण असणारा भूखंड 1
परत आलेले भूखंड 8    
वनखात्याशी वाद असणारे भूखंड 3
चुकीचे भूखंड 1

एमआयडीसीने काही दिवसांपूर्वी या संदर्भात सर्वेक्षण केले होते. त्यात खोल दरी, नाला, चुकीच्या आकाराचे भूखंड दुरुस्त होणे शक्‍य होऊ शकते, असे दिसून आले. हे भूखंड दुरुस्त झाल्यानंतर नव्या उद्योगांना ते देणे शक्‍य होईल. भूखंड चांगले करण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करावा लागणार आहे.
- संजीव देशमुख, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ 

Web Title: vally land business