इच्छुकांमुळे महागड्या वाणांची लूट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 जानेवारी 2017

पुणे - संक्रांतीला एरवी छोट्या-मोठ्या वस्तू वाण म्हणून दिल्या जातात. परंतु सध्या महापालिका निवडणुकीमुळे इच्छुक मात्र महागडे वाण लुटत आहेत. कुंकवाचा करंडा, रंगीबेरंगी रुमाल, साबणवडी या पारंपरिक वस्तूंबरोबरच जेवणाचे डबे, थरमास, डिनर डीश, आकर्षक ‘फ्लॉवर पॉट’, चहा कप आणि ग्लासचा सेट अशा महागड्या वस्तू लुटत इच्छुकांनी आपला हात मोकळा सोडल्याचे  यानिमित्ताने दिसून येत आहे.

संक्रांतीचे वाण लुटताना त्या त्या वस्तूंवर आपली ‘छबी’ आणि प्रभाग क्रमांकाचा उल्लेख करायला इच्छुक विसरत नाहीत. यानिमित्ताने प्रभागात आपली प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न इच्छुक आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य करीत आहेत. त्यात महिला इच्छुक, तर घरोघरी पोचून वाण लुटण्याला प्राधान्य देत असल्याचे दिसून आले. महापालिका निवडणुकीसाठी जेमतेम सव्वा महिन्याचा अवधी राहिल्याने सणासुदीचे निमित्त साधून इच्छुक आपल्या प्रभागातील मतदारांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. नव्या वर्षात बहुतेक प्रभागांमधील इच्छुकांनी आपल्या नावाचे ‘कॅलेंडर’ घरोघरी पोचविले आहे. त्यापाठोपाठ आता महिला मतदारांपर्यंत पोचण्याच्या उद्देशाने संक्रांतीचे वाण लुटण्याचा सपाटा लावला आहे. त्यात, पारंपरिक वस्तूंबरोबर दैनंदिन वापरासाठी आवश्‍यक असलेल्या वस्तूंना प्राधान्य असल्याचे दिसून येत आहेत. घरात अधिक ठळकपणे दिसून येईल, अशा वस्तूही वाण म्हणून, मतदारांपर्यंत पोचविल्या जात आहेत. महिला इच्छुकांनी प्रभाग सौंदर्य प्रसाधने लुटली असल्याचे एका प्रभागातील नागरिकांनी सांगितले. घरातील शालेय मुलांकरिता जेवणाचा डबा, चांगल्या दर्जाच्या पाण्याच्या बाटल्याही दिल्या आहेत. महापालिका निवडणुका आणि संक्रांतीच्या सणामुळे गेल्या काही दिवसांपासून बाजारात विविध प्रकारच्या वस्तू उपलब्ध झाल्या आहेत. त्यात, नवीन्य राखण्याचा प्रयत्नही व्यावसायिकांनीही केली आहे.

Web Title: van purchasing expensive varieties by interested candidate