खोडदचे जालिंदर कोरडे यांना राज्य सरकारचा वनश्री पुरस्कार 

दत्ता म्हसकर
शुक्रवार, 29 जून 2018

जुन्नर (पुणे) : खोडद ता.जुन्नर येथील जालिंदर शिवराम कोरडे यांना राज्य सरकारचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार जाहीर झाला असून या पुरस्काराचे रविवारी (ता. १ जुलै) कल्याण जि.ठाणे येथे वितरण होणार आहे.

जुन्नर (पुणे) : खोडद ता.जुन्नर येथील जालिंदर शिवराम कोरडे यांना राज्य सरकारचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार जाहीर झाला असून या पुरस्काराचे रविवारी (ता. १ जुलै) कल्याण जि.ठाणे येथे वितरण होणार आहे.

याबाबतचे पत्र सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय अधिकाऱ्यांनी कोरडे यांना दिले असल्याची माहिती उपवनसंरक्षक अर्जुन म्हसे यांनी दिली.
आजही खोडद गावात गेले की तीच जुनी पुराणी व मोडकळीस आलेली केशकर्तनालयाची थोड्याच जागेत लाकडाच्या फळ्या ठोकलेली जालिंदरची टपरी दिसते. कधी तिची सुधाराणा करावी हा विचार त्यांच्या मनात आला नाही. पण दाढी व केस कापता कापता केस कापण्यासाठी आलेल्या ग्राहकांना त्याच्या घरची खुशाली विचारून त्याने ग्रामस्थांना आपलंस केले.

दोन वेळची उपजीविका याच व्यवसायातुन करणे व बाकीचा वेळ अध्यात्म व वृक्षसंवर्धनास देणे हाच त्यांचा दररोजचा नित्यनियम आहे. त्याने नित्यनियमाने मनापासून वृक्षसंवर्धन केले. स्वतः अंगा-खांद्यावर पाणी वाहून एक हजार झाडे जगविली म्हणून ग्रामस्थांना त्याचा सार्थ अभिमान आहे. या कार्याबद्दल वनविभाग जुन्नरचे उपवनसंरक्षक अर्जुन म्हसे यांनी त्यास मानपत्र देवून सन्मान केला आहे.

पिंपळवंडी (ता.जुन्नर) येथील कोमात गेलेल्या दिडवर्ष बाळाची बातमी त्याच्या कानावर गेली त्यावेळी. त्याने फोनवर माजी सैनिक रमेश खरमाळे यांच्याशी संपर्क केला व या बाळाला मी खोडद गावच्या शंभर ग्रामस्थांच्या मदतीने दहा हजाराची मदत करणार हा संकल्प व्यक्त केला. आठवडाभर रोजी रोटीचे सलूनचे दुकान बंद ठेवून तो ग्रामस्थांना भेटला. घटनेचे गांभीर्य सांगून प्रत्येकी रू 100/-रुपये जमा केले व एकूण  10500/- गावच्या सरपंचांना घेऊन पिंपळवंडी येथे बाळाचे वडील गणेश कोकाटे यांच्या घरी जाऊन दिले अशी सामाजिक जाणिव असणाऱ्या जालिंदरने खोडदमध्ये एक हजार झाडे लावून त्याचे संवर्धन केल्याने येथे भेट दिल्यानंतर तेथे झाडात गाव की गावात झाड प्रत्यक्ष पाहून जालिंदरचे कौतुक करायला विसरत नाही.

Web Title: vanashree award to jalindar korade from khodad