निर्भीड पत्रकारितेला पाठबळ द्या - वरदराजन

निर्भीड पत्रकारितेला पाठबळ द्या - वरदराजन

पुणे - ‘‘जनतेला सत्य समजले पाहिजे. सत्य जाणून घेण्यासाठी निर्भीड पत्रकारितेमागे पाठबळ उभे करणे आवश्‍यक आहे,’’ असे मत ‘द वायर’चे संस्थापक संपादक सिद्धार्थ वरदराजन यांनी व्यक्त केले. 

‘केसरी-मराठा ट्रस्ट’तर्फे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते शुक्रवारी वरदराजन यांना ‘लोकमान्य टिळक पत्रकारिता राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महापौर मुक्ता शैलेश टिळक, डॉ. रोहित टिळक, डॉ. प्रणती टिळक, डॉ. गीताली टिळक या वेळी उपस्थित होते. 

वरदराजन म्हणाले, ‘‘प्रश्‍न विचारण्याचे स्वातंत्र्य अमेरिकेसारख्या देशातील पत्रकारांना आहे. सरकारी यंत्रणेला विचारलेल्या प्रश्‍नांमुळे कोणतीही तपासयंत्रणा पत्रकारांचा पाठलाग करत नाही. आपल्या देशात मात्र तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. आजच्या माध्यमांनी हे प्रश्‍न नेमकेपणाने विचारले पाहिजेत. त्यासाठी तरुण पत्रकारांनी एकत्र आले पाहिजे. त्यांच्यामागे पाठबळ उभारण्याची आवश्‍यकता आहे.’’ चव्हाण म्हणाले, ‘‘सरकार हुकूमशाही पद्धतीने वागत आहे. अंमलबजावणी संचालनालय (ईडी), केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) अशा तपासयंत्रणेचा वापर सरकार करत आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आवाज उठविणाऱ्यांवर मुस्कटदाबीचा प्रयत्न करीत आहेत. याचा फटका अनेक निर्भीड वृत्तपत्र आणि समाज माध्यमांना बसला आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com