वरसगाव धरणात तरुण वाहून गेला    

धोंडिबा कुंभार
सोमवार, 16 जुलै 2018

लवासा (मुळशी) - येथील वरसगाव धरणातील पाण्यात तरुण वाहून गेल्याची घटना घडली. काल रविवार दिनांक १५ रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मिलिंद रवींद्र कीनगे (वय २८) राहणार काळेवाडी फाटा, पुणे  असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे.      

पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिलिंद हा मित्रांसोबत काल लवासा परिसरात फिरावयास आला होता. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास मूगाव येथील ओढयाच्या पाण्यात पडून वरसगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाहून गेला आहे. 

विकास मधुकर आंधळे (राहणार कोथरूड पुणे), अविनाश चौधरी (राहणार काळेवाडी), दीपक क्षेत्रे (राहणार काळेवाडी) व अमित सस्ते (राहणार सांगरूण) आदी त्याचे चार मित्र त्याच्या सोबत फिरायला आलेले होते. 

रात्रीच्या वेळी शोधकार्य शक्य नसल्याचे तहसीलदार आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाला कळवले. तसेच एनडी आरएफला कळविले. पौड पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी उपस्थित असून, आज सकाळी शोध कार्य सुरु आहे. आज दुपारी दोन वाजेपर्यंत शोध पथकाला शोध कार्यात यश आलेले नव्हते.

Web Title: In Varasgaon dam the young went away