वरवरा राव यांना २६ पर्यंत पोलिस कोठडी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 नोव्हेंबर 2018

पुणे - एल्गार परिषदेचा माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून ज्येष्ठ विद्रोही कवी वरवरा राव यांना पुणे पोलिसांनी हैदराबाद येथून शनिवारी (ता. १६) अटक केली. राव यांना आज सत्र न्यायालयात हजर केले. या वेळी सत्र न्यायाधीश के. डी. वडणे यांनी त्यांना २६ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

राव हे सीपीआय-माओवादी या प्रतिबंधित संघटनेचे सक्रिय सभासद असून; त्यांनी भूमिगत नक्षलवाद्यांसह मणिपूर व नेपाळमधून हत्यारे आणण्याचा कट रचल्याचे प्रथमदर्शनी पुरावे आहेत, असे सरकारी पक्षाने न्यायालयाला सांगितले. दरम्यान, याप्रकरणात आपल्याला चुकीची अटक झाल्याचे राव यांनी न्यायालयाला सांगितले.  

राव यांच्याविरोधातील प्रथमदर्शनी पुराव्यांच्या आधारे तपास करण्यासाठी तसेच सांकेतिक भाषेत लिहिलेल्या पत्रांतील आशयाची उकल करणे आदी बाबींचा तपास करण्यासाठी सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी राव यांना १४ दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. विविध संस्थातील विद्यार्थ्यांना नक्षलवादाच्या प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले आहे, ते विद्यार्थी सध्या कोठे आहेत याचाही तपास करायचा आहे. तसेच काश्‍मीर येथील फुटीरतावाद्यांशीही राव यांचा संवाद झाल्याने त्याबाबतही तपास करायचा आहे, असे ॲड. पवार यांनी न्यायालयाला सांगितले. 

बचाव पक्षाच्या वतीने ॲड. रोहन नहार यांनी युक्तिवाद करताना, राव यांची अटक चुकीची आहे. ही दुसरी अटक असून; नजरकैदेत असताना राव हे न्यायालयीन कोठडीत असल्याप्रमाणेच होते. पत्रांतील सांकेतिक भाषेची उकल करायची आहे, असे पोलिस म्हणतात, मग त्यांनी पत्रातील आशय वाचला कसा? पत्रांमध्ये काय लिहिले आहे, ते पोलिसांना कसे कळले? असा सवाल केला. एल्गार परिषदेचे आयोजन सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश पी. बी. सावंत व उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील यांनी केले, तरी याबाबत त्यांच्याकडे तपास का केला नाही? असाही सवाल ॲड. नहार यांनी विचारला. कोरेगाव भीमा येथे घडलेल्या दंगलीचा संबंध एकबोटे आणि भिडे यांच्याशी असल्याचे सुरवातीला म्हटले गेले, आता अचानक पोलिस कोरेगाव भिमाच्या दंगलीचा संबंध माओवाद्यांशी जोडत आहेत. राव यांच्याविरोधात ठोस पुरावे नसल्याने पोलिस कोठडीची आवश्‍यकता नसल्यामुळे त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करावी, अशी मागणी नहार यांनी केली. 

Web Title: varavara rao police custody crime