वर्धमान जैनस्थानकाचे होणार उद्घाटन

प्रा. प्रशांत चवरे
रविवार, 22 जुलै 2018

भिगवण :  येथील समस्त जैन बांधवाच्या वतीने बांधण्यात आलेल्या श्री. वर्धमान जैन स्थानकाचे उद्घाटन अहमदनगरचे खासदार दिलीप गांधी व सुभाष बोरा यांचे हस्ते व राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील, इंदापुरचे आमदार दत्तात्रय भरणे, शिरुरचे उद्योजक प्रकाश धारीवाल यांचे उपस्थितीत करण्यात येणार असल्याची माहीती संघपती अशोक रायसोनी, वर्धमान जैन स्थानक संघाचे अध्यक्ष अभय रायसोनी व उपाध्यक्ष मनोज मुनोत यांनी दिली आहे.

येथील जैन बांधवाच्या वतीने भव्य जैनस्थानकाची उभारणी करण्यात आली आहे. जैन स्थानकासाठी सुभाष बोरा यांनी जागा उपलब्ध करुन दिली होती. जैन स्थानकासाठी उपलब्ध जागेवर श्री. वर्धमान जैन स्थानक संघाच्या वतीने भव्य जैन स्थानकाची उभारणी करण्यात आली आहे. सोमवारी(ता.२३) सकाळी नऊ वाजता उदघाटन सोहळ्यास सुरुवात होणार आहे. सकाळी नऊ वाजता जैन मुनींच्या उपस्थितीत शोभा यात्रा काढण्यात येणार आहे. त्यानंतर खासदार दिलीप गांधी,सुभाष बोरा, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील व आमदार दत्तात्रय भरणे यांचे उपस्थितीत जैन स्थानकाचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन जैन स्थानक संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
 
Web Title: Vardhman Jananasthanak will be inaugurated