पुणे - मांजरीत विविध उपक्रमाने आंबेडकर जयंती

कृष्णकांत कोबल
शनिवार, 14 एप्रिल 2018

मांजरी (पुणे) : अनाथाश्रमातील विद्यार्थ्यांना भोजन, महादेवनगर भागातील नागरिकांसाठी मोफत पिण्याचे पाणी, उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिंचा गौरव व गौरव गितांचे सादरीकरण करुन येथील जनकल्याण युवा विचार मंचाच्या वतीने डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

संस्थेचे अध्यक्ष पितांबर धिवार,  जिल्हा बँकेचे संचालक सुरेश घुले, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सीमा सावंत, माजी ग्रामपंचायत सदस्य मंदाकिनी नलावडे, महेश टेळे, प्रमोद गिरी, गोरक्ष गायकवाड, सुनील घुले, विशाल ढोरे, शिवाजी भाडळे, अक्षय भाडळे, बालाजी गायकवाड, संभाजी गायकवाड, बळीराम गायकवाड, गिरिश खरात, संजय तिकुटे, गुलाब धिवार, नितीन मोरे,  शिवराम कांबळे, प्रा. युवराज कांबळे , प्रा. विजय पैठणी आदी यावेळी उपस्थित होते.

विद्याभुषण डॉ. प्रशांत पगारे, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णकांत कोबल,  उद्योजक बाजीराव धंदे, होम मिनिस्टर फेम किरण पाटील, डाळींबच्या सरपंच वनिता धिवार, लोकमीत्र सेवा संघाचे अध्यक्ष सुनील साळवे यांना यावेळी 'जनकल्याण पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले. 

डॉ. पगारे म्हणाले, "डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान हे जगाचे आकर्षण आहे. त्यांच्या विचारांचा सन्मान होईल, याचा प्रयत्न प्रत्येक भारतीयाकडून झालाच पाहिजे."

सुरेश घुले म्हणाले, "स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही आपल्या लोकशाहीतील मौल्यवान रत्ने आहेत. त्याचा आदर करणे, हीच डॉ. आंबेडकर यांना खरी आदरांजली राहील."

Web Title: with various acticities celebration of ambedkar jayanti