मनसोक्त खरेदीसाठी विविध पर्याय 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जानेवारी 2017

कधी व कुठे... 
कालावधी ः रविवारपर्यंत (ता. 29) 
वेळ ः सकाळी अकरा ते रात्री नऊ 
स्थळ ः कृषी महाविद्यालयाचे मैदान, (सिंचननगर जवळ), रेंजहिल्स 
पार्किंग व प्रवेश मोफत

पुणे - दर्जेदार व गुणवत्तापूर्ण उत्पादनांच्या खरेदीची संधी देणाऱ्या "सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल'ला सोमवारी पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मनसोक्त खरेदी अन्‌ लज्जतदार खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. 

महिला-तरुणींनी किचन अप्लायन्सेसच्या खरेदीवर भर दिला. किचन शेगडीपासून ते फ्रूट ज्यूसरपर्यंतच्या वस्तूंच्या खरेदीला त्यांनी प्राधान्य दिले. या प्रदर्शनामध्ये गृहोपयोगी वस्तूंचे विविध प्रकार सादर केले आहेत. मॉड्युलर किचनपासून ते गृहसजावटीच्या वस्तूंपर्यंतचे अनेक प्रकार आहेत. प्रदर्शनात खात्रीशीर खरेदी आणि भरघोस सवलतीची संधी लोकांना लुटता आली. 

प्रदर्शनात एक ते तीन बर्नलच्या गॅस शेगड्या, इंडक्‍शन, इलेक्‍ट्रिकल तंदूर, पीठ गिरणी, फूड प्रोसेसर्स आणि स्नॅक मेकर खरेदी करता येईल. नॉनस्टिक भांड्यांमध्ये तवा, फ्राइन पॅन, सॅंडविच पॅन आणि कढईतील नानाविध प्रकार आहेत. डायनिंग सेटपासून ते किचन अप्लायन्सेसमधील विविधता या हे प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे. इलेक्‍ट्रिकल तंदूर मेकरपासून गृहिणींना पिझ्झा, बेकरीचे पदार्थ व तंदूर रोटी तयार करता येईल. तसेच इलेक्‍ट्रिकल लंच बॉक्‍सच्या मदतीने जेवणाचा डब्बा 24 तास गरम राहील. किचन चिमणीज, कुकर्स, यूपीएस व इनव्हर्टर्स, टोस्टर्स, सोलर वॉटर हिटर्सही आहेत. गॅस-ओ-गिलच्या माध्यमातून गृहिणींना कोणतेही पदार्थ विना तेल बनवता येतील. प्रत्येक वस्तूवर एक्‍स्चेंज ऑफर आणि सवलती असल्यामुळे गृहिणींचा या वस्तू खरेदी करण्याकडे कल आहे. वॉटर प्युरिफायर, स्टिमो, आटा चक्की, यासह किचन अप्लायन्सेसचे मोठे वैविध्यपूर्ण साहित्य प्रदर्शनात उपलब्ध आहेत.

Web Title: Various options for the shopping