मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शपथविधीवर वारकरी म्हणतायेत...

Varkari
Varkari

आळंदी (पुणे)ः राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी भाजपाला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याचे वृत्त आज सकाळी आल्यानंतर आळंदीत कार्तिकी वारीमध्ये हरिनामाबरोबरच राज्याच्या राजकिय वळणाची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे. अनेक वारकरी सोशल मिडीयाच्या माध्यमातून राजकिय भूकंपाची माहिती वेळोवेळी घेताना दिसत आहे. 

राज्याच्या निवडणूकीचा निकाल लागल्यानंतर सरकार कुणाचे स्थापन होणार याचीच चर्चा होत होती. मात्र, कार्तिकी वारी सुरू झाल्यानंतर गेली चार पाच दिवस हरिनामात दंग होते. परंतु आज सकाळी झालेल्या राजकीय घडामोडींवर सोशलमिडीयाच्या अपडेट्समुळे वारकऱयांचेलक्ष वेधले गेले. 

पंधरा आमदारांसह अजित पवारांनी मारलेली उडी अन् मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शपथविधीच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओंवरून वारक-यांमधे उलट सुलट चर्चा सुरू झाली. वारीतही काहींना आनंद झाला तर काहींना जिव्हारी लागले. याहीपेक्षा काही वारक-यांनी मात्र आपण हरिचे दास आणि आपले चित्त विचलित होवू नये अशीही प्रतिक्रिया दिली. सकाळपासून दर्शनबारीत हरिनामाचा गजर होता. मात्र, शहरात इतरत्र मात्र राजकारणाची चर्चा रंगू लागल्या.

वृद्धांचे लक्षही सोशल मिडियाकडे होते. वर्तमानपत्रातील सकाळची बातमी सकाळीच शिळी झाली. त्यामुळे वृत्तपत्र वाचूनही लोकांना सुरूवातीचे दोनतिन तास राज्याच्या घडामोडीचे वृत्त खरे वाटले नाही. अनेकजण एकमेकांमधे खरं आहे अशी विचारणा करू लागले. सोशलमिडियावर तर काही गावाकडे फोन करून शरद पवार साहेब काय म्हणाले, उद्धव ठाकरे, संजय राऊत काय म्हणाले, कॉंग्रेसची भूमिका काय, खासदार सुप्रिया सुळेचे काय म्हणणे असेल याबाबत चर्चा करत होते. काह आता अजित पवारांची जागा रोहित पवार घेणार का अशी चर्चा करत होते.
 
काहींनी मत व्यक्त करताना म्हटले की, वंशपरंपरेचे राजकारण टिकणार नाही. काही म्हणाले बहूमताचा अनादर केला. तर निष्ठावंत वारकरी म्हणाले, आपण आपल्या हरिनामाशी प्रामाणिक असले पाहिजे. मात्र, तरिही सूज्ञ लोक वाट चुकलेत अशा विविध प्रतिक्रिया वारक-यांनी दिल्या. यामुळे आजच्या दिवस राज्याच्या घडामोडीकडे लागल्याने वारीतही चर्चा सरकार नक्की कुणाचे याचीच चर्चा आहे. एकंदर वारीतही शरद पवार आणि त्यांची राष्ट्रवादी सोबत भाजपाचे सरकार आल्याबाबत काहींनी आनंदही व्यक्त केला.
 
आळंदीत पेढे वाटून आनंद साजरा
आळंदी पालिकेत भाजपाची सत्ता आहे. भाजपाचे पदाधिकारी आणि नगरसेवक नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर यांच्या दालनात एकत्र आले. यावेळी प्रामुख्याने शहराध्यक्ष भागवत आवटे, यात्रा समिती सभापती सागर सागर बोरुंदीया यांनी फटाके वाजवून आणि पेढे वाटून आनंद व्यक्त केला.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com