विधिमंडळात भिडे यांची उणीव भासते -डॉ. नीलम गोऱ्हे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

पुणे - ""राजकीय घराणी, सामाजिक व धार्मिक संघटनांचा अभ्यास, पाणीप्रश्‍नांसह सर्वसामान्यांच्या समस्यांवर ज्येष्ठ पत्रकार वरुणराज भिडे यांनी विपुल लेखन व कार्य केले आहे. त्यांच्यासारखा साक्षेपी पत्रकार विधिमंडळाच्या पत्रकार कक्षात नसल्याची उणीव नेहमीच भासते,'' असे मत आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली. 

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात पत्रकार वरुणराज भिडे मित्रमंडळाच्या वतीने "भिडे स्मृती पुरस्कार' वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. या वेळी अध्यक्षस्थानी साहित्य संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, मंडळाचे संस्थापक प्रा. विलास जोशी, अध्यक्ष उल्हास पवार उपस्थित होते. पत्रकार श्रीधर लोणी यांना "वरुणराज भिडे स्मृती पुरस्कार', तर जयश्री बोकील, सुहास देशमुख आणि महेश तिवारी यांना "आश्‍वासक पत्रकारिता' पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच भाग्यश्री चौथाई आणि चंद्रकांत काईत या विद्यार्थ्यांचाही गौरव केला. 

गोऱ्हे म्हणाल्या, ""राज्याचे शिक्षणमंत्री किंवा सरकार बदलल्याशिवाय महाराष्ट्राचे शिक्षण बदलणार नाही. व्यक्ती कितीही चांगली असली तरी सुधारणा होत नाही. मांडलेले विविध प्रश्‍न अजूनही प्रलंबित आहेत. वरुणराज भिडे यांच्याकडे पत्रकारितेसाठी आवश्‍यक असलेला तिसरा डोळा होता. त्यांच्याकडून आम्ही सहिष्णुता शिकलो.'' 

सूत्रसंचालन अंकुश काकडे यांनी केले, तर विकास वाळुंजकर यांनी आभार मानले. वरुणराज भिडे यांच्यावरील संकेतस्थळासाठी डॉ. गोऱ्हे यांनी 25 हजार रुपयांचा धनादेश दिला.

Web Title: Varunraj Bhide Memorial Award distribution ceremony