
Vasant More : कुठे आहेत वसंत मोरे? इथे...; सभेमधला फोटो शेअर करत सूचक ट्वीट
Vasant More News : मनसे नेते वसंत मोरे आपल्या सोशल मीडियावरच्या पोस्ट्समुळे सतत चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा ते त्यांच्या ट्वीटमुळे चर्चेत आले आहेत. हे ट्वीट आहे राज ठाकरेंच्या सभेमधलं. मोरेंनी एक फोटोही यासोबत शेअर केला आहे.
वसंत मोरे यांनी एक ट्वीट केलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये मोरे म्हणतात,"आज वर्धापन दिनामध्ये चर्चा होती Where is Vasant More, Here is Vasant More! आणि शेजारी पण नीट बघा कोण होते". यासोबत मोरेंनी फोटोही शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये त्यांच्या शेजारी राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि मनसे युवा सेनेचे नेते अमित ठाकरे दिसत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा काल १७ वा वर्धापन दिन होता. या वर्धापन दिनानिमित्त ठाण्यामध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी राज्यभरातल्या मनसैनिकांनी हजेरी लावली होती.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या सभेदरम्यान जोरदार फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीकाही केली.