वसुंधरा चित्रपट महोत्सव आजपासून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 जानेवारी 2019

पुणे - तेराव्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून (ता. ३) सुरवात होत आहे. ७ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाचे उद्‌घाटन दिग्दर्शक शेकर दत्तात्री यांच्या हस्ते होईल. बालगंधर्व रंगमंदिर येथे सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या उद्‌घाटन कार्यक्रमात पाणीसंस्कृतीचे अभ्यासक आणि महाराष्ट्र शासनाच्या जलनियोजन समितीचे माजी अध्यक्ष प्रा. विजय परांजपे यांना ‘किर्लोस्कर वसुंधरा जीवनगौरव सन्मान’ प्रदान करण्यात येणार आहे.

महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. महोत्सव निमंत्रक गौरी किर्लोस्कर, महोत्सवाचे अध्यक्ष माधव चंद्रचूड, डॉ. सचिन पुणेकर या वेळी उपस्थित होते. चित्रपट आणि लघुपट निर्माते गौतम पांडे, राहीबाई सोमा पोपेरे यांना वसुंधरामित्र सन्मान, पत्रकार राखी चव्हाण यांना वसुंधरा पर्यावरण पत्रकार सन्मान या वैयक्तिक पुरस्कारांबरोबरच ‘वसुंधरामित्र’ (संस्था) सन्मान मल्टिजीपीएसडब्ल्यू एम युनिटला याच कार्यक्रमात प्रदान करण्यात येईल. अतुल किर्लोस्कर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येतील.  

‘प्लॅस्टिकला नकार, वसुंधरेला होकार’ हा या वर्षीच्या महोत्सवाचा विषय आहे. चित्रपट दिग्दर्शक नल्लामुथ्थू यांच्या  ‘क्‍लॅश ऑफ टायगर्स’ चित्रपटाने महोत्सवाची सुरवात होणार त्यानंतर दिग्दर्शक दत्तात्री यांच्या ‘फ्रॉम किलर रोडस्‌ टू ह्युमन हायवेज’ हा लघुपट उपस्थितांना पाहता येणार आहे. ४ जानेवारीला दुपारी साडेचार वाजता बालगंधर्व कलादालनात छायाचित्रकार सचिन राय यांच्या हस्ते छायाचित्र व व्यंग्यचित्र प्रदर्शनाचे उद्‌घाटन होईल. 

महोत्सवाअंतर्गत दाखविण्यात येणारे चित्रपट  

तारीख  वेळ ठिकाण 
३ जानेवारी 
सायंकाळी साडेआठपासून  बालगंधर्व रंगमंदिर  
  ग्यामो- द क्वीन ऑफ माउंटेन्स
  वन झिरो झिरो
  प्लास्टिसाईज्ड

४ जानेवारी 
सायंकाळी पावणेसहापासून - जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन
  स्मॉल डॅम्स बिग प्रॉब्लेम्स
  सोनीक सी
  ओशीअन्स मोनोपॉली

५ जानेवारी 
सायंकाळी ५.५५ पासून - जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन 
  अ टोड स्टोरी
  ॲक्रॉस अंटार्टिका
  फ्लाइंग रेनबो

६ जानेवारी 
सायंकाळी ६.४० पासून - जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन 
  तारा अल्पीनीया निग्रा 
  गंगनोली- लाइफ इन चोक्‍ड डिसोलेशन
  फिनिशिंग पाल्क बे

७ जानेवारी 
  सायंकाळी साडेसातपासून - बालगंधर्व रंगमंदिर
  रेसिंग एक्‍सींगशन
  द प्लॅस्टिक काउ
  ग्रीन गोल्ड ऑन फायर

या वर्षीच्या छायाचित्र स्पर्धेचे निकाल 
  प्रथम क्रमांक : मकरंद परदेशी
  द्वितीय क्रमांक : मंदार घुमरे
  तृतीय क्रमांक (विभागून) : अमीत चोरडिया व गौरव देशपांडे 

Web Title: Vasundhara Film Festival today start